शालेय पोषण आहारासाठी शाळांना मिळेना सिलेंडर

शालेय पोषण आहारासाठी शाळांना मिळेना सिलेंडर
Published on
पोषण आहारासाठी सिलिंडर मिळेना ----------------------------- कसमादेत गावोगावच्या शाळांची स्थिती सकाळ वृत्तसेवा कंधाणे, ता. २१ : शासनाच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये सुरू असलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पोषण आहार शिजविण्यासाठी शाळांना सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. सिलींडरच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारावर विपरीत परिणाम होत असून शासनाच्या नागरी पुरवठा विभागाने सर्व गॅस एजन्सी धारकांना शाळांसाठी नियमितपणे सिलेंडरचा पुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी बागलाण तालुक्यातील मुख्याध्यापकांनी केली आहे. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व शाळांमधील गळती व कुपोषण थांबवून विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थिती वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्य व शासनमान्य संस्थांच्या शाळांमध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू आहे. योजनेत कालपरत्वे विविध बदल करण्यात आले त्यानुसार आहार शिजविण्यासाठी सरपन आणि त्याद्वारे होणारे प्रदूषण व मुख्याध्यापकांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाने गॅस जोडणी उपलब्ध करून देत पोषण आहार गॅसवर शिजवण्याची सक्ती केली. एकीकडे गॅसवर शिजविण्याची सक्ती असताना दुसरीकडे सिलेंडर मिळवण्यासाठी रजिस्टर मोबाईल फोनवरून बुकिंग ओटीपी अनिवार्य केला. तसेच दोन सिलेंडर बुकींग मधील किमान २५ पेक्षा अधिक दिवसांचे अंतराची अट लागू केल्याने पोषण आहारासाठी सिलेंडर मिळवणं अडचणीचे ठरत आहे. तसेच शाळांना प्राधान्याने गॅस पुरवठा करण्याच्या सूचना असताना मुख्याध्यापकांना गॅस एजन्सींकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मुख्याध्यापकांची नाराजी आहे. गॅस एजन्सीधारकांना शाळांनी तत्काळ सिलेंडर उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा चुलीवर पोषण शिजवून दिला जाईल असा इशारा सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com