सुरज शिंपी सीए उतीर्ण

सुरज शिंपी सीए उतीर्ण
Published on
सूरज शिंपी : KSM26B01651 ---------- कुसुंब्यांचा सूरज शिंपी सीए परीक्षेत उत्तीर्ण कुसुंबा (ता. धुळे) : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकांउटंन्स (आय.सी. ए.आय.) तर्फे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए. परीक्षेचा फायनल निकाल नुकताच जाहीर झाला. दोन्ही गटांसाठी झालेल्या परीक्षेचा निकाल १४.०७ टक्के लागला. यात धुळे तालुक्यातील कुसुंबा (ता. धुळे) येथील मुळ रहिवासी असलेले मात्र सद्यस्थितीत मुंबईस्थित सूरज अनंत शिंपी यांनी चार्टर्ड अकाऊंटन्सी अभ्यासक्रमाच्या काठिण्य पातळीवर मात करून उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांनी सीपीटी, इंटरमीडीएट अशा परीक्षांमध्ये यश प्राप्त करत रोजच्या १२ ते १५ तासांचा अखंड अभ्यास करून अत्यंत आव्हानात्मक सीए, फायनल परीक्षेत यश संपादन केले आहे. सूरज शिंपी हे कुसुंबा येथीलच मात्र मुंबईस्थित असलेले माध्यमिक शिक्षक तसेच सिने पत्रकारिता, प्रसिद्ध टी. व्ही. कलावंत, अभिनय, लेखन, दिग्ददर्शनाकडे वळालेले अनंत शिंपी यांचे ते पुत्र आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com