जनता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या यशाचा गुणगौरव सोहळा
११ विद्यार्थ्यांची इंडियन आर्मीत निवड; नुरा शेख सीए, शुभम मोरे महाराष्ट्र पोलिस दलात
सकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता. २५ : जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील ११ विद्यार्थ्यांची इंडियन आर्मीत निवड, माजी विद्यार्थिनी नुरा शेख हिने सीए परीक्षा उत्तीर्ण होणे तसेच माजी विद्यार्थी शुभम मोरे याची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाल्याबद्दल विद्यालयात गुणगौरव सोहळा उत्साहात झाला. मविप्र समाज संस्थेचे संचालक प्रवीण (नाना) जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागे मेहनत, पालकांचे संस्कार व शिक्षकांचे परिश्रम असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी जिद्द, शिस्त आणि सातत्याच्या बळावर मोठी स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहन केले.
प्रवीण (नाना) जाधव अध्यक्षस्थानी होते. सोहळ्यास दत्तात्रय जाधव, भारत खांदवे, नाना मोरे, गंगाधर निखाडे, सुजित अप्पा मुरकुटे, संतोष आंबेकर, उत्तमराव जाधव, बाळासाहेब दिवटे, शांताराम वाघ, संपतराव मेधने, विलास जाधव, प्राचार्य शरद शेजवळ, डी. के. टोपले, आर. एस. शिंदे, टी. जी. शिंदे यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य शरद शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. भारत खांदवे, गंगाधर निखाडे, नाना मोरे, संतोष आंबेकर व सीए नुरा शेख यांनी मनोगत व्यक्त केले. कर्मवीर ज्ञानसमृद्धी स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी अवनी संजय सुरसे, मुक्ता भाऊराव बोरस्ते, स्वरा ज्ञानेश्वर पताडे, आरोही लक्ष्मण गोसावी, शिवानशु चंद्रभान बोराडे, स्नेहल सचिन भागवत, वेदांत भालचंद्र जाधव, ईश्वरी स्वप्निल देशमुख, प्रांजल रविंद्र मवाळ तसेच इंडियन आर्मीत निवड झालेले अंकुश गायकवाड, क्रीश पाटील, आकाश सांगळे, समाधान अपसुंदे, करण पागे, अक्षय राऊत, करण दरगोडे, उत्कर्ष गवारे, कुणाल कोकाटे, सिद्धार्थ बर्डे, गौरव कराटे यांचा सत्कार झाला. संतोष कथार यांनी सूत्रसंचालन, तर नेहा देशमुख यांनी आभार मानले.