फोटो 15327
मालेगाव कॅम्प : विजेच्या तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटताना महावितरणचे कर्मचारी
-----
फोटो - 15328
मालेगाव कॅम्प : झाडाच्या फांद्या छाटताना महावितरणचे कर्मचारी
मेन
पाऊसही सूरू अन पूर्व पावसाळी कामही..
----------------------------------
तालुक्यात महावितरणचे कामे अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव कॅम्प, ता.२३ : पावसाळा ऋतू सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी तालुक्यातील महावितरण विभागाकडून मान्सून पूर्व देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. मात्र यंदा
पावसाळाच लांबल्याने पूर्व पावसाळी कामेही लांबली आहे. दोन दिवसांपासून एकाचवेळी पाऊसही सुरू आहे. त्याचवेळी पूर्व पावसाळी कामेही सुरु असल्याचे चित्र आहे.
शहरी व ग्रामीण भागाचे कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.झाडांच्या फांद्या छाटणे, विजेच्या तारांना ताण देऊन दुरुस्त करणे, वादळी वाऱ्यात पडलेले विजेचे खांब दुरुस्त करणे, लोंबकळणाऱ्या तारा, गावोगावच्या विजेच्या ट्रांसफार्मर मधील तेल बदलणे, विजेच्या तारांना घासणाऱ्या झाडांची पाहणी करून फांद्या तोडणे, उघड्या विजेच्या तारांना आवर घालणे यासह विविध देखभाल दुरुस्तीच्या कामांना गती आली आहे.
पावसाळ्यात विजेचे खांब धोकादायक खांबापासून सुरक्षित अंतर ठेवा. वीज तारा लोंबकळत असतील तर वीज वितरण कंपनीला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरी व ग्रामीण भागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊन दुरुस्तीची कामे करून घ्यावी. गावातील महावितरण कंपनी कर्मचारी नागरिकांची दखल घेत मान्सून पूर्व कामे अंतिम टप्प्यात आहे.
चौकट
इथे सुरु आहे काम.
मुंगसे सेक्शन, मालेगाव कॅम्प फीडरमधील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या महावितरण कर्मचारी यांच्याकडून तोडल्याने ग्रामीण भागात विजेचा अडथळा कमी झाला आहे. यात अभियंता विनीत राऊत, गजेंद्र चव्हाण, पंकज सोनवणे, राहुल शेवाळे, वैभव शेवाळे आदीच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहेत.