घात - अपघात

घात - अपघात
Published on
दोन दुचाकींच्या अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी जखमी मालेगाव : एरंडगाव-सावकारवाडी रस्त्यावर दोन दुचाकींच्या अपघातात पतीचा मृत्यू, तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रावसाहेब नथ्थु शेजवळ (वय ४८) व पत्नी ताराबाई रावसाहेब शेजवळ (वय ४३) हे स्प्लेंडर (एमएच ४१ डब्ल्यू २२०२) दुचाकीवरून एरंडगाव-सावकारवाडी मार्गाने जात असताना पाठीमागून आलेल्या (एमएच १५ एचडी २९५२) दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रावसाहेब शेजवळ यांचा मृत्यू झाला, तर ताराबाई शेजवळ गंभीर जखमी झाल्या. सोमवारी २२ जूनला दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान हा अपघात झाला. याप्रकरणी मृताचे भाऊ केशव नथ्थु शेजवळ (रा. एरंडगाव) यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नपूर्ती नगरात विवाहितेचा मृत्यू मालेगाव : येथील स्वप्नपूर्ती नगरातील गायत्री किशोर बागुल (वय ३३) यांचा बुधवारी (ता. २४) सकाळी मृत्यू झाला. पती किशोर बागुल सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना उठविण्यास गेले असता त्या प्रतिसाद देत नव्हत्या. त्यानंतर त्यांना सकाळी आठच्या सुमारास येथील संकल्प हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. सुराणा यांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सौंदाणे येथे दुचाकी चोरी मालेगाव : सौंदाणे (ता. मालेगाव) येथून २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. कारभारी देवाजी सागर (वय ५९) यांची (एमएच ४१ बीडी २५९२) दुचाकी २१ जूनला रात्री ११ ते २२ जून रोजी सकाळी ७ या कालावधीतचोरट्याने लंपास केली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com