नांदगावात धर्मांतरासाठी प्रलोभन आणि धमक्यांचा आरोप ; सहा जणांविरोधात तक्रार..

नांदगावात धर्मांतरासाठी प्रलोभन आणि धमक्यांचा आरोप ; सहा जणांविरोधात तक्रार..
Published on
धर्मांतरासाठी प्रलोभन, नकार दिल्यावर धमक्यांचा आरोप --- नांदगाव पोलिसांत तक्रार; हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन, चौकशीची मागणी सकाळ वृत्तसेवा नांदगाव, ता. २४ : शहरात तरुणाला धर्मांतरासाठी विविध प्रकारची प्रलोभने दाखवून नकार दिल्यावर धमकावल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ओम नीलेश काळे (वय १८, रा. नांदगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. २२) दुपारी अडीचला ते घराजवळ उभे असताना काही व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी नाव, धर्म व कुटुंबाची माहिती विचारल्यावर विशिष्ट धर्म स्वीकारल्यास घरातील अडचणी दूर होतील, आजारी व्यक्ती बऱ्या होतील, आर्थिक मदत मिळेल, नोकरी लागेल तसेच इतर लाभ मिळतील, असे सांगून धर्मांतरासाठी प्रलोभन दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. फिर्यादीने धर्मांतरास नकार दिल्यावर संबंधितांनी त्याला व त्याच्या कुटुंबीयांना भीती वाटेल अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. तसेच, रोख रकमेचे आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सिद्धार्थ गौतम, रोहित खरात, ज्ञानेश्वर गायकवाड, दीपक बोरसे (रा. नाशिक), जिग्ना चंद्रकांत पटेल (रा. मुंबई) व सुजीवनी विजय घोडेकर (रा. नाशिक) यांच्यासह अन्य काही महिलांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत. चौकट धर्मांतर प्रकरणी कारवाईची मागणी धर्मांतराच्या कथित प्रकरणाच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, तसेच सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी नांदगाव पोलिस ठाण्याच्या आवारात आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. धार्मिक श्रद्धांवर आघात करून धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करीत अशा प्रकारांना तातडीने आळा घालावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन पोलिस निरीक्षक यशवंत सोळसे यांना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com