वर्गणीसाठी परवानगी आवश्यक्य

वर्गणीसाठी परवानगी आवश्यक्य
Published on
वर्गणीसाठी पूर्वपरवानगी बंधनकारक उल्लंघनास दंड व कारावासाची तरतूद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : सार्वजनिक धार्मिक, सामाजिक अथवा धर्मादाय कार्यक्रमांसाठी नागरिकांकडून वर्गणी, देणगी किंवा निधी जमा करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती, मंडळे आणि संस्थांनी धर्मादाय विभागाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे धर्मादाय उपायुक्त नीता श्रीनिवार यांनी स्पष्ट केले आहे. परवानगीसाठी संबंधितांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या अर्जात निधी संकलनाचा उद्देश, अपेक्षित रक्कम, निधी जमा करण्याची पद्धत आणि संकलित निधीचा विनियोग याबाबतची सविस्तर माहिती देणे बंधनकारक राहील. धर्मादाय विभागाकडून अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र प्रकरणांमध्ये अटी व शर्तींसह परवानगी दिली जाते. परवानगी न घेता वर्गणी किंवा देणगी गोळा करणे हे कायद्याचे उल्लंघन ठरते. अशा उल्लंघनासाठी संबंधितांवर कारवाईची तरतूद असून परवानगीशिवाय जमा केलेल्या रकमेच्या दीडपट रकमेइतका दंड आणि तीन महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक उत्सवांचे आयोजन करणाऱ्या मंडळांनी निधी संकलन करताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. परवानगी मिळाल्यानंतर परवानगीच्या कालावधीत जमा झालेल्या निधीचा योग्य हिशेब ठेवणे आवश्यक आहे. परवानगीची मुदत संपल्यानंतर विहित कालावधीत संबंधित हिशेब सादर करणे बंधनकारक राहील. निधी संकलनातून शिल्लक राहिलेल्या रकमेबाबतही कायद्यातील तरतुदींचे पालन करावे लागणार आहे. निधीचा अपहार झाल्यास किंवा जमा झालेल्या निधीचा विहित पद्धतीने हिशेब सादर न केल्यास संबंधित मंडळ किंवा व्यक्तीविरुद्ध स्वतंत्र कारवाई करण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्त कार्यालयाला आहेत. अशा प्रकारच्या गैरप्रकारांबाबत नागरिकांना किंवा तक्रारदारांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल करता येईल, असेही उपायुक्त सौ. श्रीनिवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com