NSK26H19185
जळगाव : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक ‘नीट’ परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द केल्याच्या निषेधार्थ शहरातील काव्यरत्नावली चौकात निदर्शने करताना अभाविपचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
-----
‘नीट-यूजी’ रद्द प्रकरणी अभाविपची निदर्शने
उपशीर्षक
काव्यरत्नावली चौकात आंदोलन; चौकशीसह कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : नीट-यूजी २०२६ परीक्षेमध्ये समोर आलेल्या अनियमितता, पेपर लीक व परीक्षा प्रक्रियेतील गंभीर त्रुटींच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव शाखेतर्फे शहरातील काव्यरत्नावली चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनामध्ये ११ वी-१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, नीटचे परीक्षार्थी तसेच अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा’, एनटीए जवाब दो, पेपर माफियांवर कठोर कारवाई करा’ अशी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. अभाविपने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करीत या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
अभाविपने स्पष्ट केले, की २०२४ मध्ये अशा प्रकारच्या घटना समोर आल्यानंतरही पुन्हा परीक्षा प्रक्रियेमध्ये अनियमितता होणे दुर्दैवी व निराशाजनक आहे. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षेची तयारी करीत असताना अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे.
चौकट
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संघर्ष : नन्नवरे
या वेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी अभाविप प्रत्येक विद्यार्थ्याच्या न्यायासाठी ठामपणे लढत राहील, असे सांगितले. महानगर मंत्री वरद पांढारकर यांनीही मनोगत व्यक्त करीत अभाविप रस्त्यावर उतरून संघर्ष करीत राहील, असा इशारा दिला.
--------