सकाळ एक्सक्लूझीवःशाळांचे ''समरव्हॅकेशन'' घेवुन आला चोरट्यांचा सिझन

सकाळ एक्सक्लूझीवःशाळांचे ''समरव्हॅकेशन'' घेवुन आला  चोरट्यांचा सिझन
Published on
टुडे एक, मेन फिचर ---- (संग्रहित, आयपी किंवा स्केच वापरावे) या बातमीसोबत दुसरी बातमी देत आहे. ती तीन कॉलमात क्लब करावी) इन्फोग्राफीक स्वरुपात सेट करावी. --- अडीच वर्षात ८२५ घरफोड्या; बेफिकिरी चोरट्यांच्या पथ्थ्यावर जिल्ह्यातील चित्र : उन्हाळी सुट्या, लग्नसराईत चोरटे सक्रिय; बाहेरगावी जाताना घ्या काळजी रईस शेख : सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या गुन्ह्यात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या अडीच वर्षांत शहरासह जिल्ह्यात तब्बल ८२५ घरफोड्यांच्या घटना घडल्या. शाळा-महाविद्यालयांच्या परिक्षा संपल्यावर येणाऱ्या उन्हाळी सुट्यांचा काळ चोरट्यांचा ''सिझन'' म्हणून ओळखला जात असून, सर्वांधिक गुन्हे दिवाळीच्या सुट्या आणि उन्हाळी सुट्यांच्याच काळात घडून येतात. रहिवाश्यांची निष्काळजी आणि बेफिकिरी चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. उन्हाळी सुट्यांसह लग्नसराई, पर्यटन सहली यामुळे अनेक जण बाहेरगावी जातात. मात्र घराबाहेर पडताना आपल्या घराची काळजी घेण्याची योग्य सोय करून निघाल्यास पुढील अनर्थ टाळता येतील. शहरांमध्ये फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना दुसऱ्यांच्या घरात काय घडते, याची माहितीसुद्धा नसते. त्यामुळे चोरटे फ्लॅटवर लक्ष ठेवून असतात. तुमच्या अपार्टमेंटमध्ये सुरक्षा गार्ड नसेल किंवा बाहेरून येणाऱ्याची विचारणा होत नसेल तर चोरट्यांसाठी ही सुवर्ण संधीच असते. घराला कुलूप लावून जाण्यापूर्वी घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार सहजतेने दाराचे कुलूप तोडून आत शिरल्याचे वारंवार आढळून येते. त्यासाठी घरांना सेफ्टी डोअर, चांगल्या प्रतिची लॉकिंग सिस्टिम असणे अपेक्षित आहे. निष्काळजीपणा सोडा घराच्या बाहेर कुठेही जात असाल तर घराला कुलूप लावून जाण्यापूर्वी काळजी घ्यावी.जाण्यापूर्वी शेजाऱ्याशी दोन शब्द बोलून त्यांना घराकडे थोडे लक्ष ठेवा, अशी विनंती करावी. तुम्ही जर बाहेरगावी जात असाल तर नजिकच्या पोलिस ठाण्यात सुद्धा सूचना देऊन जावे. मौल्यवान वस्तू लॉकरमध्ये ठेवा घरबंद करून बाहेर जात असाल किंवा दिवसभर जरी घराला कुलूप राहत असेल तर या मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावी. बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या लॉकरमध्ये सुद्धा या मौल्यवान वस्तू ठेवू शकता. -------- घराची सुरक्षितता - घराला मजबूत कुलूप लावा. साधे कुलूप न वापरता ''पॉइंट लॉक'' किंवा सेफ्टी लॉक वापरा. - मुख्य गेटला कडी-कोयंडा मजबूत असावा. - सर्व खिडक्या आणि मागील दरवाजे आतून बंद असल्याची खात्री करा. घर बंद असल्याचे कळते बाहेरगावी जाताना दिवे बंद असतात. परिणामी गॅलरी, कंपाऊंडमध्ये अंधार असल्याने घर बंद असल्याचे सहज कळते. शक्य असल्यास सायंकाळी दिवा लावण्यासाठी शेजाऱ्याला किंवा नातेवाईकाला सांगा किंवा मोशन-सेन्सर लाइट्स बसवा. मौल्यवान वस्तूंची काळजी सोन्याचे दागिने, रोकड आणि महत्त्वाचे दस्तऐवज घरात ठेवू नका. ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा. चोरटे सहसा कपाटे फोडून मौल्यवान वस्तू नेतात, त्यामुळे घरात ऐवज ठेवणे टाळा. शेजारी आणि पोलिस तुमच्या जवळच्या विश्वासू शेजाऱ्याला तुम्ही बाहेर जात असल्याचे सांगा आणि घराकडे लक्ष ठेवण्यास सांगा.जास्त दिवसांसाठी जात असल्यास, स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती दिल्यास पोलिस गस्त वाढवू शकतात. सीसीटीव्ही नाईट व्हिजन आणि चांगल्या प्रतिचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. अत्याधुनिक सीसीटीव्हीत मोशन सेंसर असते. कॅमेरासमोर कुणी आलेच तर, तुमच्या मोबाईलवर अलार्म वाजतो. तुम्ही मोबाईलमधून संबंधिताला विचारणा करू शकता. घरात कुत्रे असतील तर त्यांच्या नियमित जेवण-पाण्याची योय करण्यासाठी शेजारी, नातेवाईकांना सांगा. दररोज फोन करुन घराकडे जावून येण्यास सांगा. (ग्राफ करावा) घरफोडीचे गुन्हे असे वर्ष...........दाखल गुन्हे.........उघड गुन्हे २०२४.............३६६............१३८ २०२५.............३४३............११३ २०२६.............११६............१७ (एप्रिल अखेर) ------- घरफोडीत सक्रिय टोळ्या जळगाव शहरात स्थानिक काही टोळ्या घरफोडीच्या गुन्ह्यात सक्रिय आहेत. त्यापैकी काही टोळ्यांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाईत करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील काही अट्टल गुन्हेगार आणि नवनवे चोर या गुन्ह्यांत आढळून येतात. परप्रांतीय टोळ्यांमध्ये मध्य प्रदेशातील झाबुआ टोळी, सातपुड्यातील चड्डी-बनियन टोळी, यूपी-बिहार राज्यातील टोळ्या.आंध्र प्रदेशातील बिटरगुंटा टोळी, राज्यस्तरातील मराठवाडा आणि नगर भागातील तांडेवस्त्यावर वास्तव्यास असलेल्या फासेपारधी टोळ्या या काळात सक्रिय झालेल्या असतात. दिवसा रेकी रात्री घरफोडी स्थानिक गुन्हेगार कारागृहात टोळ्या बनवून, रेकी करून बंद व चालू घरांमध्ये घरफोडी करतात. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी सुरक्षा बाळगणे गरजेचे आहे. मोठ्या गुन्ह्यांना कारणीभुत घटक कंपनी, कारखान्यातील नोकरांना अचानक काढणे, ओळखपत्राशिवाय ठेवणे, त्यांच्यासमोर पैशांची चर्चा करणे आणि बाहेर जाण्याची माहिती देणे अशा निष्काळजीपणामुळे मोठे गुन्हे घडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com