खैरनारने समुपदेशनाच्या नावाखाली फसवणुकीची शक्यता

खैरनारने समुपदेशनाच्या नावाखाली फसवणुकीची शक्यता
Published on
19214, 15, 16 --- खैरनारकडून समुपदेशनाच्या नावाखाली फसवणुकीची शक्यता नीट पेपरफुटी प्रकरण : व्यावसायिक संकुलात थाटले कार्यालय सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषणाच्या (सीबीआय) पथकाने अटक केलेला शुभम खैरनार याचे कारनामे उघड होऊ लागले आहेत. मेडिकलच्या विद्यार्थ्यांसह व्यावसायिक शिक्षणाबाबत करिअर मार्गदर्शन व समुपदेशनाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शुभम याने कॅनडा कॉर्नर परिसरातील एका व्यावसायिक संकुलात त्याचे ‘एसआर एज्युकेशन कन्सल्टन्सी’ कार्यालय थाटून विद्यार्थ्यांना आकर्षित करीत होता. नीट पेपरफुटीप्रकरणी मंगळवारी (ता. १२) नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने शुभम खैरनार यास इंदिरानगर परिसरातून बेड्या ठोकल्या. शुभमला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याने वैद्यकीय शिक्षणासाठीची नीट परीक्षेचा पेपर फोडल्याचे समोर आले आहे. मुंबई नाका पोलिसांनी शुभम खैरनार राहत असलेल्या सुचितानगरमधील फ्लॅटची झडती घेतली. त्या फ्लॅटमध्ये तो काही मित्रांसह भाड्याने राहात होता. तर त्याच्या भावावर गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे समजते. वडील मधुकर खैरनार यांचा नांदगाव येथे वैद्यकीय व्यवसाय असून, सध्या हे सारे कुटुंबीय ‘नॉट रिचेबल’ झाले आहे. दरम्यान, शुभम हा मध्य प्रदेशातील सिहोर येथील वैद्यकीय महाविद्यालयात बीएसएमएसच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. परंतु तो नाशिकमध्येच राहात असून, त्याने कॅनडा कॉर्नर परिसरातील एका व्यावसायिक संकुलाच्या पहिल्या मजल्यावरच एस. आर. एज्युकेशन कन्सल्टन्सी या नावाने कार्यालय सुरू केले आहे. याठिकाणी तो विद्यार्थी व त्यांच्या पालकांना वैद्यकीय शिक्षणासाठीच्या परीक्षांसंदर्भात समुपदेशन करायचा. एमबीबीएस, बीएएमएस, बीडीडीएस यांसह पॅरामेडिकल शिक्षणासंदर्भातील माहिती तो विद्यार्थांना द्यायचा. त्यासाठी तो शुल्कही आकारात होता. त्यातून त्याने अनेकांना फसविण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ज्या व्यावसायिक संकुलात त्याने कार्यालय सुरू केले होते, त्या इमारतीत मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संदर्भात मार्गदर्शन करणारे विद्यार्थी पालकांना राबता असायचा. त्यामुळे त्याला सहज विद्यार्थी मिळत होते. नाशिकसह नागपूर, बंगलूरू, भोपाळ याठिकाणी त्याचे कार्यालय असल्याचे त्याच्या कार्यालयाबाहेरील जाहिरात फलकावरून स्पष्ट होते. यासंदर्भात सीबीआय व राजस्थान पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात शहर पोलिस बारकाईने लक्ष्य ठेवून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com