या बातमीजवळ उष्माघातसदृश बळी ही बातमी क्लब करावी
--
जळगावात उष्णतेची लाट कायम
(उपशीर्षक)
तापमानात थोडी घसरण; पारा ४४ अंशांवर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : जळगावात सलग तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ४५ अंशांवर आहे. यामुळे आज देखील उष्णतेची लाट कायम राहिली. तापमानात आज (ता.१५) एका अंशाने घसरण झाली असली तरी पारा ४४ अंशांच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
मागील आठवडाभरापासून जळगाव जिल्हा तीव्र उन्हाने तापला आहे. मे महिन्याच्या मध्यांतरात पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिला असल्याने आठवडाभरापासून वैशाख वणवा पेटल्याचा अनुभव जळगावकरांना येत आहे. गेल्या आठवड्याच्या सुरवातीपासूनच सूर्याने आग ओकण्यास सुरवात केली होती. यानंतर पारा ४४ अंशावर जाऊन पोहोचला होता. तर गेल्या तीन दिवसांपासून तापमान ४५ अंशांवर राहिले असल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली होती.
काही दिवस उष्णतेचा इशारा
जळगावमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. रात्रीच्या वेळी देखील हवेतील उष्णता कमी होत नसल्याने उकाडा कायम आहे. दरम्यान, पुढील काही दिवस उष्णतेचा इशारा कायम असून, तापमानात फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चौकट
पावसाची शक्यता कमीच
राज्यात १४ मेपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार काही भागात पाऊस देखील झाला आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे.
––––––––––