इंधन दरवाढीने आगडोंब..!

इंधन दरवाढीने आगडोंब..!
Published on
मेन -- फोटो : H19281 महागाईच्या वणव्यात सामान्यांची होरपळ इंधन दरवाढीचा भडका; दरवाढीचा थेट फटका, मासिक बजेट कोलमडणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : इंधन दरवाढीच्या घोषणेसह सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसली असून, नाशिकसह संपूर्ण राज्यात संतापाचा आगडोंब उसळला आहे. आंतरराष्ट्रीय तणावामुळे आधीच इंधन टंचाईचे सावट असताना, या दरवाढीमुळे मध्यमवर्गीयांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. ‘मर्यादित पगार आणि अफाट महागाई’ अशा कात्रीत सामान्य माणूस सापडला असून, या दरवाढीचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. -- खर्चाचा मेळ कसा घालावा इंधन महागल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती असून, सर्वसामान्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होणार आहे. दरवाढीचा निर्णय जाहीर होताच सोशल मीडियावरून आणि प्रत्यक्ष स्तरावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठराविक वेतनात वाढीव खर्चाचा मेळ कसा घालावा, असा यक्षप्रश्न नोकरदारांपुढे उभा आहे. -- काही पेट्रोलपंप बंद महिन्‍याभरात तीन ते चार वेळा इंधन टंचाईच्‍या अफवेने पंपांवर मोठी गर्दी झाल्‍याच्‍या घटना घडल्‍या. गुरुवारी (ता. १४) देखील काही पंपांवर रांगा होत्‍या. समाज माध्यमांवर पसरणाऱ्या अफवांमुळे जादाची इंधन खरेदी होत आहे. अशात शुक्रवारी दरवाढीनंतरही काही पंपांवर इंधन उपलब्‍ध नव्‍हते. अन्‍य पंपांवर पुरवठा सुरळीत होता. ------ १५ मेपासून नाशिकचे इंधनाचे सुधारित दर पेट्रोल : १०७.९३ रुपये डिझेल : ९४.४१ रुपये ------कोट युद्धामुळे तयार झालेल्या जागतिक परिस्थितीमुळे ही भाववाढ अपरिहार्य होती. देशाकडे तसेच नाशिक जिल्ह्याला पुरवठा करणाऱ्या मनमाड डेपोमध्ये भरपूर प्रमाणात इंधन उपलब्ध आहे. मात्र देशावरील परकीय चलनाचा बोजा कमी करण्यासाठी ग्राहकांनी आवश्यकतेनुसारच इंधन वापरावे. आपल्याला हवे तेवढे इंधन आपल्याला पेट्रोलपंपावर मिळेल. कुठेही गर्दी करू नये. - विजय ठाकरे, समन्वयक राज्य पेट्रोल डीलर संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com