खा. श्रीकांत शिंदे
सोमवारी नाशिकमध्ये
नाशिक : शिवसेना नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे हे सोमवारी (ता.१८) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या संदर्भात माहिती देताना लोकसभा संपर्कप्रमुख आमदार सुहास कांदे यांनी सांगितले की, ‘शिवसेना कार्यकर्ता संवाद दौऱ्यानिमित्ताने’ पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान श्रीकांत शिंदे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असून, जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेणार आहेत.तसेच, शहर व ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवासेना व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका, रणनीती आणि संघटनात्मक बळकटीकरण याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात येणार आहेत. या दौऱ्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळणार असून, शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणास मदत होईल. ‘एक गाडी, एक टीम, हरित प्रवास’ ही संकल्पना राबवून आपण पर्यावरणपूरक आणि जबाबदार नागरिकत्वाचा आदर्श निर्माण करू शकतो. या उपक्रमामुळे स्वच्छ, हरित आणि स्वावलंबी महाराष्ट्र घडविण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.