''महाटीईटी'' परीक्षा आता २८ जूनला

''महाटीईटी'' परीक्षा आता २८ जूनला
Published on
धुळे ः टुडे १ साठी --- ‘नीट’ परीक्षेमुळे ‘महाटीईटी’ परीक्षा होणार आता २८ जूनला राज्य परिषदेमार्फत वेळपत्रकात बदल सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २१ जूनला होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET-2026) आता २८ जूनला घेतली जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ परीक्षेमुळे हा बदल करण्यात आला असून, परीक्षार्थींच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’मार्फत २१ जूनला ‘नीट’ परीक्षा होणार होती. या दोन्ही परीक्षांचे बहुतांश परीक्षा केंद्र एकच येत असल्याने प्रशासकीय अडचण निर्माण झाली होती. ''महाटीईटी'' परीक्षा सुरळीतपणे पार पाडणे आणि उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार दोन्ही पेपर आता रविवारी २८ जूनला होतील. शासकीय किंवा प्रशासकीय अडचणींमुळे या वेळापत्रकात आगामी काळात काही बदल झाल्यास त्याची अद्ययावत माहिती परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahatet.in) प्रसिद्ध केली जाईल. परीक्षार्थींनी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आहे. --- १४-१ चौकट सुधारित वेळापत्रक तपशील..................................सुधारित तारीख.....................वेळ प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढणे........१६ जून ते २८ जून .................... शिक्षक पात्रता परीक्षा : पेपर- १........रविवार, २८ जून...................सकाळी १०.३० ते दुपारी १.०० शिक्षक पात्रता परीक्षा : पेपर- २........रविवार, २८ जून...................दुपारी २.३० ते सायं. ५.००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com