NSK26H22138
जळगाव : राज्यस्तरीय बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त मनस्वी पाटील.
–––
राज्यस्तरीय बाॅक्सिंग अजिंक्यपद
स्पर्धेत मनस्वी पाटीलला ‘सुवर्ण’
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : येथील खेलो इंडिया बाॅक्सिंग सेंटरची खेळाडू मनस्वी सागर पाटील हिने जळगावात झालेल्या महाराष्ट्र राज्य बाॅक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सबज्युनियर गटात सुवर्णपदक पटकाविले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याची खेळाडू मृण्मयी शिर्के हिच्या विरुद्ध झालेल्या रोमहर्षक लढतीत तिने हे सुवर्णपदक पटकावले.
आपल्या कामगिरीच्या आधारावर पंजाब येथे २२ ते २९ जून २०२६ दरम्यान होणाऱ्या पाचव्या सब ज्युनियर राष्ट्रीय बाॅक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी मनस्वीने महाराष्ट्र संघात स्थान निश्चित केले. मनस्वीला प्रशिक्षक सागर जगताप (सातारा) व नीलेश बाविस्कर (जळगाव) यांचे मार्गदर्शन लाभले. या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारी जळगाव जिल्ह्यातून एकमेव खेळाडू आहे. मनस्वी ही सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलचे उपशिक्षक सागर पाटील व आर. आर. विद्यालयातील उपशिक्षिका राजश्री भदाणे यांची कन्या आहे. मनस्वीला जिल्हा बाॅक्सिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक, पालक व सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.