खासगी रक्तपेढ्यांना केला ‘कोटा’ निश्चित

खासगी रक्तपेढ्यांना केला ‘कोटा’ निश्चित
Published on
बातमीचा परिणाम लोगो वापरावा .......... फोटो H22185 नाशिक : जिल्हा रुग्णालयात थॅलेसेमिया, सिकलसेलग्रस्त रुग्णांसंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत शहरातील रक्तपेढ्यांच्या प्रतिनिधींसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, डॉ. अनंत पवार, डॉ. दुसाने, डॉ. चंद्रशेखर आवारे आदी. ३६-३ खासगी रक्तपेढ्यांना केला ‘कोटा’ निश्चित जिल्हा शल्यचिकित्सकांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय ... सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : थॅलेसेमिया, सिकलसेलग्रस्त बालकांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे या हेतूने शहरातील रक्त संकलन करणाऱ्या रक्तपेढ्यांना ‘कोटा’ निश्चित करण्यात आला आहे. थॅलेसेमिया, सिकलसेलग्रस्त रुग्णांना रक्तासाठी त्यांच्या पालकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसमोर गाऱ्हाणी मांडली असता, त्याची गंभीर दखल घेत शहरातील रक्तपेढ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. तसेच, दर तीन महिन्यांनी याच स्वरूपाची बैठक नियमित घेण्यात येणार असल्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, नोडल ऑफिसर डॉ. अनंत पवार, रक्त संकलन अधिकारी डॉ. दुसाने, थॅलेसेमिया कक्षाचे डॉ. चंद्रशेखर आवारे यांच्यासह शहरातील जनकल्याण, अर्पण, नवजीवन, समता, नाशिक, पंचवटी या रक्त संकलन पेढ्यांसह १८ रक्त संकलन पेढ्यांचे प्रतिनिधी व जनसंपर्क अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक रक्त पेढीकडील रक्त संकलनाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात असलेल्या थॅलेसेमिया, सिकलसेलग्रस्त रुग्णांची आकडेवारी व त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या रक्तपिशव्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार रुग्णांच्या उपलब्धतेनुसार रक्त संकलन पेढ्यांना रक्तांचा ‘कोटा’ निश्‍चित करण्यात आला. अधिक प्रमाणात रक्त संकलन करणाऱ्या रक्तपेढ्यांना थॅलेसेमिया, सिकलसेल रुग्णांची थेट जबाबदारी सोपविण्यात आली, जेणेकरून या ग्रस्त रुग्ण बालकांची रक्तासाठी होणारी ससेहोलपट होणार नाही. रुग्ण बालकांना वेळेतच रक्त उपलब्ध होऊ शकण्यावर भर देण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंपी यांनी केलेल्या सूचनांना रक्तपेढ्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. .... ‘सकाळ’ने घेतली होती दखल गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयात आलेल्या थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या रक्तासाठी पालकांना धावाधाव करावी लागली होती. त्या संदर्भात ‘सकाळ’च्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाले होते. पालकांनी समस्यांचा पाढाही वाचला. त्याची गंभीर दखल घेत ही बैठक घेऊन बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. या स्वरूपाची बैठक नियमित दर तीन महिन्यांनी घेण्याचे निश्चित करण्यात आले असून, रुग्ण बालकांची ससेहोलपट होणार नाही याची दक्षता घेण्याचीही ताकीद जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com