टुडे ४ सेकंड मेन
NSK26H22293
जळगाव : उपमहापौर मनोज चौधरी शहरातील पाणीपुरवठा तसेच जलसुरक्षाबाबत पाणीपुरवठा विभागाशी चर्चा करताना.
....
शहरात पाणीचोरी, गळतीला लागणार चाप
उपमहापौर चौधरी : पाणी बचतीसह जलपुनर्भरण व्यवस्था अनिवार्य
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : शहराच्या भविष्यातील पाणी गरजा लक्षात घेऊन जळगाव महानगरपालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन पाणी बचतीसंदर्भात प्रशासनाला व्यापक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सुमारे ६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून तो अंदाजे सात महिने पुरेल इतकाच असल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील ४३ विहिरी आणि ६० बोअरवेल हे पूरक जलस्रोत म्हणून कार्यरत आहेत. मात्र भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संधारण आणि भूजल पुनर्भरणावर भर देणे आवश्यक असल्याचे उपमहापौरांनी स्पष्ट केले.
रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य
शहरातील मोठे बांधकाम प्रकल्प, व्यापारी संकुले, गृहसंकुले, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था अनिवार्य आणि प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
२० टक्के पाणी वापर कमी करा
पाणी बचतीसाठी एकूण वापरामध्ये किमान २० टक्के घट करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यासाठी जलवाहिन्यांतील गळती रोखणे, अनधिकृत वापरावर कारवाई, पाण्याचा पुनर्वापर आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे. पाणी चोरी, बायपास लाईन, मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाईचेही संकेत देण्यात आले आहेत.
कोट..
पाण्याचा वापर प्रत्येक नागरिकाने जपून केला पाहिजे. तसेच पुनर्वापरित पाण्याचा वापर करण्यास प्राधान्य देण्यावर भर देणे आवश्यक असून पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘माझे पाणी माझा अभिमान’ या अभियानातून नागरिकांचा सहभाग वाढवून पाणी वाचविणे तसेच घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था करावी.
- मनोज चौधरी, उपमहापौर, जळगाव शहर महापालिका.