जिल्हाधिकाऱ्यांकडे कुंभमेळा आयुक्तपदाचा पदभार

जिल्हाधिकाऱ्यांकडे कुंभमेळा आयुक्तपदाचा पदभार
Published on
जिल्हाधिकारी प्रसाद यांच्याकडे कुंभमेळा आयुक्तपदाचा पदभार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : सिंहस्थ-कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह रजेवर असल्याने त्यांच्या पदाचा तात्पुरता पदभार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कुंभमेळ्याची कामे सुरळीत सुरू राहावीत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक-त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळ्यास ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने हाती घेण्यात आलेल्या विकासकामांना गती देण्यात आली आहे. या विकासकामांमध्ये पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन तसेच भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा समावेश आहे. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कुंभमेळा आयुक्त सिंह हे विविध विभागांमध्ये समन्वयाची महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. सिंह हे काही दिवस सुटीवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत विकासकामांची गती कायम राखण्यासाठी जिल्हाधिकारी प्रसाद यांच्याकडे आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com