NSK26H22373
जळगाव : कारखान्यातील बॉलरला लागलेली आग विझविताना अग्निशामक दलाचे जवान.
---
जळगावात वेफर्स कारखान्यात आग
---
लाखोंचे नुकसान; थोडक्यात अनर्थ टळला
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : औद्योगिक वसाहत परिसरातील जनावरांच्या बाजाराजवळील (सेक्टर एन-५) अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रिज कारखान्यात मंगळवारी (ता. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. कारखान्याचे संचालक जितेंद्र अग्रवाल यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यावरून अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वेफर्स कारखान्यात लागलेल्या आगीत तेल, पुठ्ठा, बॉयलर, पंखे तसेच, रूममधील इतर साहित्य खाक झाले. आग वेगाने पसरत असताना, अग्निशमन दलाने धाव घेत, पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले.
आगीची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजित घरडे यांच्यासह भारत बारी, वाहनचालक देवीदास सुरवाडे, संजय भोईटे आणि दीपक चौधरी यांच्या पथकाने अथक परिश्रमातून दीड तासांत आगीवर नियंत्रण मिळविले.
चौकट
आगीवर वेळीच नियंत्रण
औद्योगिक परिसरात आग लागलेल्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आले, अन्यथा संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून मोठी वित्त आणि जीवितहानीची शक्यता होती. अग्निशमन दलाच्या तत्काळ प्रतिसादामुळे आग वेळीच नियंत्रणात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत आगीची नोंद झाली आहे.