NSK26H22400
मुंबई : नियतीचे चक्र पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते स्वीकारताना डॉ. प्रितेश चौधरी. शेजारी अमृता फडणवीस, शांतीलाल मुथा.
-----
नियतीचे चक्र पुरस्काराने
प्रीतीश चौधरी सन्मानित
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २४ : सुरवाडा (ता.जामनेर) येथील रहिवाशी डॉ. प्रितेश गणेश चौधरी यांना अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘नियतीचे चक्र’ हा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत यश संपादन करणाऱ्या महाराष्ट्रातील काही निवडक व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या (२०२६) वर्षाच्या पुरस्कारासाठी डॉ. चौधरी यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. भारतीय जैन संघटना व दिव्याच फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराने अधिक काम करण्याचे बळ मिळेल व समाजातील शोषित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहता येईल, असे मत डॉ. चौधरी यांनी व्यक्त केले.