पावसाचे आगमन होताच बाजारपेठेने कुस बदलली विविध वस्तूंच्या दरात हालचाल

पावसाचे आगमन होताच बाजारपेठेने कुस बदलली
विविध वस्तूंच्या दरात हालचाल
Published on
ॲंकर (फोटो एआयचा वापरावा) -- पावसाचे आगमन होताच बाजारपेठेने बदलली कूस पावसाळी वस्तूंच्या दरांत वाढ; छत्र्या, वॉटरप्रूफ बॅग, रेन कव्हरला मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२६ : मॉन्सूनच्या आगमनानंतर शहरातील बाजारपेठेचे स्वरूप बदलले आहे. उन्हाळी वस्तूंची मागणी कमी होत असताना पावसाळी साहित्य, गरम खाद्यपदार्थ, भाजीपाला आणि कृषी साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या पावसाळी साहित्याची विक्री वाढली असून व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शहरातील बाजारपेठेत सध्या विविध प्रकारच्या छत्र्या १५० ते ८००, तर ब्रँडेड छत्र्या १००० पर्यंत विकल्या जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी रेनकोट २५० ते ६००, तर प्रौढांसाठी ५०० ते १५०० दरम्यान उपलब्ध आहेत. गमबूटची किंमत २५० ते ७०० असून वॉटरप्रूफ शालेय बॅग कव्हर ५० ते २०० दराने विकले जात आहेत. पावसाळ्यामुळे गरम खाद्यपदार्थांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. चहाचा कप १० ते १५, कॉफी २० ते ३०, कांदा भजी ४० ते ६० प्लेट, बटाटा वडा १५ ते २० नग दराने विकले जात आहे. भाजीपाल्याच्या बाजारातही दरांमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. टोमॅटो ३० ते ५० किलो, बटाटा २५ ते ३५ किलो, कांदा २० ते ३० किलो, भेंडी ५० ते ६० किलो, कोथिंबीरची जुडी १० ते २० दरम्यान उपलब्ध आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बियाणे व खतांच्या खरेदीकडे वळले आहेत. सोयाबीन बियाण्यांची ३० किलोची बॅग २३०० ते ३५००, कापूस बियाण्यांचे पाकीट ७५० ते ९५०, तर डीएपी खताची पिशवी १३५० ते १७०० दरम्यान विकली जात आहे. वाहनांच्या देखभालीसाठी लागणाऱ्या वस्तूंनाही मागणी वाढली आहे. दुचाकी वायपर स्प्रे १०० ते २५०, चारचाकी वायपर ३०० ते १२००, तर दुचाकी रेन कव्हर २५० ते ६०० दराने उपलब्ध आहे. कोट पावसाच्या सुरुवातीमुळे छत्र्या, रेनकोट आणि पावसाळी साहित्याच्या विक्रीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास मागणी आणखी वाढेल. - रामलानी, स्थानिक व्यापारी, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com