योग दिनाला दांडी मारणे पडणार महागात

योग दिनाला दांडी मारणे पडणार महागात
Published on
योग दिनाला दांडी; मनपा अधिकाऱ्यांना नोटिसा विभागप्रमुखांचाही समावेश; २४ तासांत खुलासा सादर करण्याचे निर्देश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या योग प्रशिक्षण कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या विभागप्रमुखांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कार्यक्रमास गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून, २४ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रविवारी (ता. २१) सकाळी साडेसहाला मापालिकेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त महापालिकेतर्फे सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आयुक्तांसह काही मोजके अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहिले, तर अनेक विभागप्रमुख आणि अधिकारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. केवळ ३५ जणांची हजेरी महापालिकेत योग दिनाच्या कार्यक्रमास प्रत्यक्षात आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (महसूल), भांडार विभागप्रमुख यांच्यासह केवळ ३५ जणच या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे दिसून आले. तर महापालिकेतील अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. चौकट गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस महत्त्वाच्या शासकीय उपक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांची गैरहजेरी आढळल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. कार्यालयीन आदेशाचे पालन न करणे ही शिस्तभंगाची बाब मानत अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी संबंधित विभागप्रमुखांना नोटिसा बजावल्या आहेत. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com