पोलिस महानिरीक्षकांनी घेतला जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा

पोलिस महानिरीक्षकांनी घेतला जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा
Published on
शहर - जिल्हा कॉमन NSK26H22461 जळगाव : पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे यांचे स्वागत करताना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे. --- पोलिस महानिरीक्षकांनी घेतला जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावीपणे करावी, कारवाईच्या सातत्यासह संख्येत वाढ करावी, हद्दपारीसाठी पाठविलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करावा, अशा सूचना नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. नाशिकला पदभार स्वीकारल्यानंतर श्री. येनपुरे यांनी बुधवारी (ता. २४) प्रथमच जळगावला आढावा घेतला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. अपर अधीक्षक संदीप गावित (जळगाव), अशोक नखाते (चाळीसगाव), उपअधीक्षक नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक सतीश गोराडे, वाहतूक शाखेचे निरीक्षक संजय गायकवाड उपस्थित होते. प्रलंबित गुन्ह्यांचा तपास विशेष पोलिस महानिरीक्षकांनी कोणताही गुन्हा वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित नसावा, अशा सूचना दिल्या. जिल्ह्यात ३२६ गुन्हे प्रलंबित आहेत. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या नगण्य आहे. हद्दपारीचे ४६ प्रस्ताव पाठविले असून, ते प्रलंबित आहेत. या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. ठोस पुरव्यांचेच चार्जशीट सादर करा तपासावर असलेल्या गुन्ह्यांत ठोस पुराव्यांचे संकलन महत्त्वाचे असून, कन्व्हेक्शन रेट वाढविण्यासाठी ठोस पुरावे असल्याशिवाय चार्जशीट सादर करू नये, गुन्ह्यांच्या निपटाऱ्यासाठी उपअधीक्षकांनी प्रत्येक गुन्ह्याच्या तपासाधिकाऱ्यांची नियमित दप्तर तपासणी करावी, अशा सूचनाही श्री. येनपुरे यांनी दिल्या. एनडीपीएस व इतर गुन्ह्यांवरही चर्चा होऊन त्यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com