रिंगरोडच्या काँक्रीटीकरणाला अखेर मुहूर्त

रिंगरोडच्या काँक्रीटीकरणाला अखेर मुहूर्त
Published on
सेकंड मेन NSK26H22514 जळगाव : बहिणाबाई उद्यानापासून रिंगरोडच्या काँक्रिटीकरणासाठी मक्तेदाराकडून सुरू असलेली पूर्वतयारी. --- रिंगरोडच्या काँक्रिटीकरणाला अखेर मुहूर्त --- आचारसंहिता संपताच वेग; बहिणाबाई उद्यानापासून कामाची पूर्वतयारी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : गेल्या काही महिन्यांपासून अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार वाहिनीच्या कामामुळे रिंगरोडची अक्षरशः चाळण झाली होती. ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या समस्येवर तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली असून, रिंगरोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. रिंगरोडवरील बहिणाबाई चौधरी उद्यानासमोर अमृत योजनेंतर्गत भूमिगत गटार वाहिनी टाकण्याचे काम सुमारे दोन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. या कामात वाहिनी टाकण्याबरोबरच आवश्यक चेंबरची उभारणीही पूर्ण करण्यात आली. मात्र या प्रक्रियेसाठी रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने संपूर्ण मार्गावर खड्डे निर्माण झाले होते. परिणामी, दैनंदिन वाहतूक धोकादायक बनली होती. खड्ड्यांमुळे अपघात दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते. अनेक ठिकाणी अचानक आलेल्या खड्ड्यांमुळे किरकोळ तसेच गंभीर अपघातही घडल्याच्या घटना समोर आल्या. पावसाळ्याच्या सुरुवातीने परिस्थिती आणखी बिकट झाली. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आचारसंहितेमुळे विलंब या रिंगरोडच्या काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काम सुरू करण्यात विलंब झाला होता. दरम्यान, आचारसंहिता गुरूवारपासून समाप्त झाली असून, कामाला गती मिळू लागली आहे. गुरुवारी सकाळपासून बहिणाबाई चौधरी उद्यान परिसरात मक्तेदाराकडून यंत्रसामग्री उभारणी, मोजमाप तसेच अन्य पूर्वतयारीची कामे सुरू करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रत्यक्ष काँक्रिटीकरणाच्या कामाला शनिवारी सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चौकट महापौरांचा पाठपुरावा रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेता महापौर दीपमाला काळे, महापालिकेचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर या मागणीला प्रतिसाद मिळाल्याने रिंगरोड परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com