शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी

शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी
शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी
Published on
संक्षिप्त ‘टीईटी’ परीक्षा रविवारी; प्रतिबंधात्मक आदेश जळगाव : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीइटी) रविवारी (ता. २८) शहरातील ३० परीक्षा केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी शहरात ३० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात गैरप्रकार होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, रविवारी पेपर सुरू झाल्यापासून ते पेपर समाप्त होईपर्यंत (सकाळी ८ ते सायंकाळी ५) शहरातील सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने संबंधित कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी कळविले आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com