NSK26H22567 (सिंगल कॉलम)
पारोळा ः श्री जनार्दन मंदिरात समापन आरती करताना नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाविक.
पारोळा येथे आरती महोत्सव साजरा
जनार्दन मंदिरात नगराध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली समापन आरती
सकाळ वृत्तसेवा
पारोळा, ता. २६ ः येथील सुमारे साडेपाचशे वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री जनार्दन मंदिरात अधिक मासानिमित्त काकड आरती महोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते समापन महोत्सव आरती करण्यात आली.
यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुरुषोत्तम काकड आरती, आरती महोत्सवासह भावगीतांचा कार्यक्रम पार पडला. महोत्सवात भजनी मंडळाचे गायन, नित्य बालभोग सेवा, आंबा महोत्सव, आईची गोड गाणी पुस्तिकेचे वितरण, ५६ भोग, गायत्री परिवाराचा दीपोत्सव असे विविध कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरे झाले. समाप्ती काकड आरती उपनगराध्यक्ष ॲड. रोहन मोरे व जिल्हा दूध संघाचे संचालक पराग मोरे यांच्याहस्ते सहपत्नीक करण्यात आली. यावेळी विश्वस्त शाम देवळे, जगदीश शर्मा, प्रशांत वाणी, कैलास चौधरी, मंदिराचे व्यवस्थापक विश्वास कोळी, सुदर्शन कोळी, प्रा. सुनील कोळी, प्रेमनाथ कायस्थ आदी उपस्थित होते. महोत्सवात श्री जनार्दन मंदिरात शहरातील महिला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंदिर विश्वस्तांचे या उपक्रमाबाबत कौतुक करून पुरुषोत्तम मासांत राबविलेले उपक्रम फलदायी असल्याची भावना व्यक्त केली.
--------------------------