अमली पदार्थांचा नाश

अमली पदार्थांचा नाश
Published on
धुळे ः टुडे ३ साठी -- फोटो क्रमांक ः 22585 धुळे : पोलिस मुख्यालयातील खड्ड्यात अमली पदार्थांचा नाश केला जात असताना उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचारी. -- दोन कोटींच्या अमली पदार्थांचा नाश - पोलिस मुख्यालय : २३ गुन्ह्यांतील मुद्देमाल खड्ड्यात पुरला सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २६ : आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधीदिनानिमित्त धुळे जिल्हास्तरीय प्रादेशिक अमली पदार्थ नाश समितीने जिल्ह्यातील २३ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले सुमारे दोन कोटी नऊ लाख ४९ हजार ३८० रुपयांचे अमली पदार्थ पर्यावरणपूरक पद्धतीने नष्ट केले. पोलिस मुख्यालय परिसरात शुक्रवारी (ता. २६) समितीच्या उपस्थितीत खड्ड्यात पुरून हा मुद्देमाल नष्ट केला. गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत धुळे, चाळीसगाव रोड, मोहाडी, देवपूर, दोंडाईचा, शहादा, शिंदखेडा आणि शिरपूर शहर पोलिस ठाण्यांमध्ये दाखल २३ गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल नाशासाठी मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया राबविण्यात आली. यात ९०१.५०६ किलो गांजा, १७३.९० किलो अफूचे बॉण्ड, ९४ ग्रॅम एमडी, दोन हजार १४८ कोडीन फॉस्फेट कफ सिरपच्या बाटल्या आणि २२० अल्प्राझोलाम गोळ्यांचा समावेश होता. - मुद्देमाल नष्ट प्रक्रिया जिल्हास्तरीय प्रादेशिक अमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष तथा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या अध्यक्षतेत ही कारवाई झाली. समितीच्या सदस्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे, अपर पोलिस अधीक्षक अभिजित सोनवणे, तहसीलदार अतुल येवले, सहायक रासायनिक विश्लेषक अतुल पाटील तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. पंच म्हणून एच. एल. जोशी आणि महेंद्र कपाडे यांनी कामकाज पाहिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमाल नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. - सप्ताहाचा समारोप याच दिवशी नशा मुक्त भारत अभियान सप्ताहाचा समारोपही पोलिस मुख्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश डिंगळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक आनंद यांनी केले. सहायक आयुक्त देवीदास नांगणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, मनोविकारतज्ज्ञ डॉ. सचिन लोहार, विलासराव करकरे, शशिकांत भदाणे, आर. आर. पाटील, डॉ. संजय सिसोदे यांची उपस्थिती होती. अभियानाच्या यशस्वीतेसाठी निमा पी. जाधव, सोहन कन्नरजित जाधव, हर्शल पाटील आणि वर्षा गुंजाळ यांनी संयोजन केले. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com