ग्रामसमृद्धी नांद्रा लेख ३

ग्रामसमृद्धी नांद्रा लेख ३
Published on
ग्रामसमृद्धी नांद्रा लेख ३ --- NSK26H27963 : शरद पाटील --- NSK26H28226 : शरद पाटील यांचे कुटुंबीयांसह टिपलेले छायाचित्र. --- NSK26H28227 (आई वडिलांचे छायाचित्र) --- NSK26H28228 : आमदार किशोर पाटील यांच्यासह शरद पाटील. --- NSK26H28229 : सुभद्राई स्टोन क्रशर’ प्लांटवरील छायाचित्र. --- NSK26H27966 : पाचोरा येथील दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधताना शरद पाटील. ---- NSK26H27965 : हॉटमिक्सद्वारे सुरू असलेली रस्त्याची कामे. ---- हेडिंग संघर्षातून उभारले उद्योगविश्व सब हेडिंग ‘सुभद्राई स्टोन क्रशर’चे शरद पाटील यांचा प्रवास लीड... अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वाटचाल सुरू केलेल्या शरद बळीराम पाटील यांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःचे विश्व उभे केले. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी बाजारात भाजीपाला विकला, दूध डेअरीत नोकरी केली आणि पुढे व्यवसायाची वाट धरली. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. आज ‘सुभद्राई स्टोन क्रशर अँड आरएमसी प्लांट’च्या माध्यमातून त्यांची यशाकडे दमदार वाटचाल सुरू आहे. समाजाने दिलेले पाठबळ लक्षात ठेवून नव्या पिढीला उभे करण्याची त्यांची धडपड कायम आहे. --- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नांद्रा गावातील गरीब कुटुंबात शरद बळीराम पाटील यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच बिकट आर्थिक परिस्थितीशी झुंज देत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षण नांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण गावातच झाले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये सिव्हिल ड्राफ्टस्मनचा दोन वर्षांचा व्होकेशनल कोर्स केला. तो करीत असतानाही शैक्षणिक आणि प्रवासाचा खर्च त्यांना स्वतः भाजीपाला विकूनच भागवावा लागत असे. ठेकेदारी व्यवसायात पदार्पण सिव्हिल ड्राफ्टस्मनचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून शरद यांना पाचोरा येथील प्रसिद्ध काँट्रॅक्टर ‘लक्ष्मी कन्स्ट्रक्शन’मध्ये ७५० रुपये दरमहा पगारावर नोकरी लागली. त्यांनी पहिली तीन वर्षे दरमहा ७५० रुपये पगारावर, तर पुढील दोन वर्षे दरमहा ३ हजार रुपये पगारावर काम केले. नंतर स्वतःच ठेकेदारीच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. सन २००१ मध्ये शरद पाटील यांनी ठेकेदारी व्यवसायासाठी रजिस्ट्रेशन केले. सुरुवातीच्या काळात कामे मिळविण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला. नंतर खासदार निधी, आमदार निधीतील कामे मिळत गेली. त्यांना पहिले काम मिळाले ते मौजे तारखेडा खुर्द येथे खासदार निधीतून स्मशानभूमीचे बांधकाम करण्याचे. त्यानंतर तत्कालीन आमदार तात्यासाहेब तथा आर. ओ. पाटील यांच्या आमदार निधीतून कामे मिळाली. सुभद्राई स्टोन क्रशर अँड आरएमसी प्लांट या वाटचालीत शरद पाटील यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कौटुंबिक परिस्थिती खूप हलाखीची असल्याने घरातून आर्थिक पाठबळ नव्हतेच. त्या परिस्थितीत कसेतरी भांडवल उभे करून कामे सुरू ठेवणे, हे फार मोठे आव्हान होते. ज्या वेळी काम करीत असताना, काही अडचणी येऊ लागल्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, काहीतरी वेगळे, मोठे पाऊल उचलले पाहिजे. तेव्हा गुरुवर्यांकडून मिळालेल्या प्रेरणेने शरद पाटील यांनी हॉटमिक्स प्लांट टाकण्याचा निर्णय घेतला. सन २०२२ मध्ये हॉटमिक्स प्लांट सुरू केला आणि तेथून शरद पाटील यांच्या व्यवसायास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. चालू परिस्थिती आणि भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन नंतर स्टोन क्रशर, आरएमसीसी प्लांट असे दोन नवीन प्रकल्प त्यांनी उभे केले. व्यवसायात कालानुरुप बदल करीत गेल्याने यश मिळत गेले. त्यानंतर पत्नीची मदत घेत शरद यांनी सुभद्राई स्टोन क्रशर अँड आरएमसी प्लांट ही नवीन फर्म स्थापन केली. मदत करणाऱ्यांविषयी कृतज्ञता आपल्या व्यावसायिक यशात माजी आमदार किशोर आप्पा पाटील तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण पाटील यांची मोलाची साथ लाभली, असे शरद पाटील सांगतात. तसेच वेळोवेळी केलेल्या योग्य मार्गदर्शनाबद्दल ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविषयी ऋण व्यक्त करतात. आपल्या यशात कुटुंब, मित्रपरिवारासह समाजाचेही मोठे योगदान आहे, असे ते सांगतात. रोज सकाळी उठून गाईंचे दूध काढणे, गोठा साफ करणे, या कामांनी शरद पाटील यांच्या दिवसाची सुरुवात होते. नंतर सुरू असलेल्या कामांची माहिती घेऊन त्यांचा प्राधान्यक्रम ते ठरवितात. कोट माझ्या यशात समाज, मित्रपरिवार आणि हितचिंतकांचे मोठे योगदान आहे. मिळालेल्या सहकार्याचे ऋण फेडण्यासाठी नव्या पिढीतील युवकांना व्यवसायात मदत व मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. ठेकेदारी व्यवसाय करताना आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. नवीन पिढीने उत्पन्न आणि खर्चाचा योग्य ताळमेळ साधूनच व्यवसाय करावा. अन्यथा भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. - शरद बळीराम पाटील संचालक, एस. बी. पाटील कन्स्ट्रक्शन प्रा. लि.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com