चक्क इनोव्हातून गोवंशीय जनावरांची तस्करी

चक्क इनोव्हातून गोवंशीय जनावरांची तस्करी
Published on
कारमधून गोवंश जनावरांची तस्करी नाशिक, ता. ३० : प्रवासी वाहन असलेल्या इनोव्हा कारमधून चक्क गोवंश जनावरांची कत्तलीसाठी तस्करी केली जात असल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाठलाग करणाऱ्या गोरक्षकांमुळे संशयितांची इनोव्हा कार अंबड - लिंक रोडलगतच्या लोखंडी खांबाला धडकून अपघात झाला. त्यानंतर संशयित कारचालक व त्याचा साथीदारांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. इनोव्हात निर्दयीपणे कोंबलेल्या तीन गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन गोविंद पाटील (२६, रा. मटाले चौक, कामटवाडा, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, सदर घटना शनिवारी (ता. २९) पहाटे चारच्या सुमारास अंबड लिंक रोडवरील ग्लॉस्को कंपनीसमोर घडली. गोवंश जनावरांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी इनोव्हा कारचा (एमएच ०५ जी २४८८) एक्सलो पॉईंटपासून पाठलाग सुरू केला. त्यावेळी संशयित इनोव्हा कारचालकाने अंबड लिंक रोडने कार भरधाव पळवून नेत असताना ग्लास्को कंपनीसमोर रस्त्यालगतच्या लोखंडी पोलला धडकले. त्यावेळी कारमधील दोघा संशयितांनी पकडले जाण्याच्या भीतीने पलायन केले. तीनही जनावरांची सुटका करण्यात आली. एक लाखांची इनोव्हा कार जप्त करण्यात आली असून, हवालदार शेळके हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com