दिव्यांग भगिनींसोबत जिल्हाधिकाऱ्यांचे रक्षाबंधन

दिव्यांग भगिनींसोबत जिल्हाधिकाऱ्यांचे रक्षाबंधन
Published on
टुडे ३ ॲंकर NSK26H28318 जळगाव : गाडेगाव येथील सुप्रीम इंडस्ट्रीज येथे दिव्यांग भगिनीकडून राखी बांधून घेताना जिल्हाधिकारी रोहन घुगे. ------- दिव्यांग भगिनींसोबत जिल्हाधिकाऱ्यांचे रक्षाबंधन उपशीर्षक स्वयंदीप परिवाराचा उपक्रम; सुप्रीम फ्रेंडस्‌ ग्रुपचेही सहकार्य सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : स्वयंदीप परिवार, चाळीसगावच्या माध्यमातून दिव्यांग भगिनींसोबत रक्षाबंधनाचा स्नेहपूर्ण सोहळा सुप्रीम इंडस्ट्रीज, गाडेगाव येथे भावनिक वातावरणात पार पडला. सुप्रीम फ्रेंड्स ग्रुपच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी स्वयंदीप परिवाराच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. दिव्यांग भगिनींच्या पाठीशी भाऊ म्हणून सदैव खंबीरपणे उभे राहण्याच्या त्यांच्या भावनेबद्दल मीनाक्षीताईंनी जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले. स्वयंदीप परिवारातील दिव्यांग भगिनींसाठी निवासी प्रकल्पाकरिता घर खरेदी करून दिल्याबद्दल सुरेश मंत्री व ज्ञानदेव महाडिक यांचे श्रीमती निकम यांनी आभार मानले. आरोग्यदूत पितांबर भावसार यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. या वेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला अनिल भोकरे, राजेंद्र ठोंबरे, डी. आर.पाटील, विपुल पारीख, जी. के. रमेश, संजय पाटील, धनंजय जेहूरकर, एन. एम. पाटील, व्ही. एस. पाटील, सुगन मुनोत, पितांबर भावसार, अतुल लढ्ढा, अमोल शूर, यश खिवसरा यांच्यासह सुप्रीम फ्रेंड्स ग्रुपचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत बियाणी यांनी केले, तर आभार राजेंद्र ठोंबरे यांनी मानले. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com