धुळे : टुडे पान ३ साठी..
--
फोटो क्रमांक : 28335
धुळे : रिमांड होममध्ये रक्षाबंधन साजरे करताना तेली समाज महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्या.
--
तेली समाज महिला मंडळातर्फे
रिमांड होममध्ये रक्षाबंधन
--
मुला- मुलींसोबत साजरी केली राखी पौर्णिमा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३१ : महानगर तिळवण तेली समाज महिला मंडळातर्फे रक्षाबंधनाचे औचित्य साधून शहरातील मुला- मुलींच्या रिमांड होममध्ये उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात रिमांड होममधील मुला- मुलींना राख्या बांधून पेढे, बिस्किटे व खाऊचे वाटप करण्यात आले.
जिल्हाध्यक्षा सुमन महाले यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात जिल्हाध्यक्षा महाले मार्गदर्शन केले. रिमांड होमसारख्या ठिकाणी राहणाऱ्या मुला- मुलींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महानगर तिळवण तेली समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा गीता चौधरी, सचिव जयश्री बाविस्कर आदींनी संयोजन केले. माजी महापौर तथा नगरसेविका कल्पना महाले, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महिला मंडळ अध्यक्षा दीपिका चौधरी, सीमा करनकाळ, कल्पना चौधरी, रेखा थोरात, महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा कविता अहिरराव, प्रियंका चौधरी, प्रभावती जाधव, निता सूर्यवंशी, उज्वला बोरसे उपस्थित होत्या. तसेच, रिमांड होमचे कर्मचारी रेखा शिंदे, मनीषा नानकर, राजदिप पाटील आणि गौरव वानखेडकर यांनी सहकार्य केले.