धुळे टुडे १ संक्षीप्त

धुळे टुडे १ संक्षीप्त
Published on
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- वसुली अधिकाऱ्यास दोघांकडून मारहाण धुळे : कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी चांदगड (ता. शिंदखेडा) येथे गेलेल्या बजाज कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याला दोघांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. प्रतीक भिका वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोपाळ शामराव मगरे व योगेश (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली. या घटनेत वाघ यांच्या खिशातील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि २३ हजार ४५० रुपये रोख रक्कम गहाळ झाली. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - गणेश मंदिरात चोरी; चांदीचा मुकुट लंपास धुळे : कुंडाणे- वार (ता. धुळे) शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत असलेल्या इच्छापूर्ती गणेश मंदिरातून चोरट्यांनी चांदीचा मुकुट व दानपेटीतील रोख रक्कम, असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. २३ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास चार चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून प्रवेश केला. गणेशमूर्तीवरील १५ भार वजनाचा पाच हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट व दानपेटीतील सुमारे ४५ हजार रुपये घेऊन ते पसार झाले. अमित भगवान महाजन यांच्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - लग्न मोडण्याचा प्रयत्न जाब विचारल्याने हल्ला धुळे : ‘त्या मुलीशी लग्न करू नको, माझे तिच्याशी प्रेमसंबंध आहेत,’ असा फोन तरुणीच्या होणाऱ्या पतीला करून तिचे ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न केल्याचा जाब विचारल्याने तरुणासह त्याच्या नातेवाइकांनी दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना रायपूर (ता. साक्री) येथे घडली. मंदिराजवळ झालेल्या हल्ल्यात फिर्यादीच्या मुलाच्या डोक्याला, तर पत्नीच्या हाताला दुखापत झाली. याप्रकरणी भिवा कृष्णा कारंडे, मधू भिवा कारंडे, पोपट भिवा कारंडे, नागो कृष्णा कारंडे, उत्तम नागो कारंडे, पिंटू नागो कारंडे, दशरथ लहानू कारंडे, संदीप उत्तम कारंडे, दिनेश लुका कारंडे, विकास गोरख कारंडे, प्रकाश गोरख कारंडे, समाधान बापू थोरात व सुरेश लुका कारंडे यांच्याविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - विवाहितेचा लैंगिक छळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा धुळे : विवाहितेचा लैंगिक छळ करून तक्रार केल्यास घराबाहेर काढण्याची धमकी दिल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२३ या कालावधीत जयशंकर कॉलनी परिसरात ही घटना घडली. तक्रारीनुसार झफर खान अमानुल्लाह खान याने विवाहितेशी अश्लील वर्तन करून लैंगिक छळ केला. याबाबत पतीला माहिती दिल्यानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास घरातून बाहेर काढण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच तक्रारीवर विश्वास न ठेवता शिवीगाळ करून संशयिताला पाठिंबा दिल्याचा आरोप मकसूद खान अमानुल्ला खान, शबनम रहिमोद्दीन शेख, रहिमोद्दीन नरोद्दीन शेख (रा. शिरपूर), अफसर मोसिनोद्दीन शेख व मोसिनोद्दीन नूरादीन शेख (रा. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) यांच्यावर करण्यात आला. - ग्रँडरचे पाते लागून कारागिराचा मृत्यू धुळे : फर्निचरचे काम करीत असताना ग्रँडर मशीनचे पाते हातातून सटकल्याने छातीला गंभीर दुखापत झालेल्या ५२ वर्षीय कारागिराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोवर्धन गोपाल लोहार (५२, रा. जैतोबा नगर, देवपूर- गोंदूर रोड) हे रविवारी दुपारी दुकानात फर्निचरचे काम करीत होते. त्यावेळी ग्रँडरचे पाते छातीला लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com