(टुडे पान एक मेन)
फोटो : NSK26H28462
नंदुरबार : पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी. शेजारी सहायक जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे.
------------------------------
जिल्ह्यातील ११ लाख ५९ हजार मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदत
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी शुध्द व पारदर्शक करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यात मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १३ लाख ४८ हजार ५७४ मतदारांपैकी ११ लाख ५९ हजार ८२७ मतदारांच्या माहितीचे डिजीटायझेशन पूर्ण करण्यात आले आहे. तर एक लाख ८८ हजार ४७४ मतदारांची नोंद गैरहजर, स्थलांतरीत, मयत अथवा दुबार आढळून आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सहायक जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे उपस्थित होत्या.
-----------
ज्या पात्र मतदारांची नावे नमूद प्रारुप मतदार यादीत आढळून येणार नाहीत किंवा जे नवमतदार असतील त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडून सदर अर्जाची पडताळणी करुन पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. या कालावधीत (दावे व हरकतीचा कालावधी) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना ६ किंवा ८ भरु शकतील. दावे व हरकती दाखल करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. नोटीस टप्पा, दावे व हरकतींचा निपटारा करण्याची मुदत २९ ऑक्टोंबरपर्यंत आहे. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. मुदत संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार या यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरुन हरकत घेऊ शकेल.
अंतिम मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार यादीमधील नोंदीमध्ये सुधारणा करता येते किंवा नाव समाविष्ट करता येते. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र व्यक्तीस आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विहीत नमुना ‘क ६’ मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील सुधारणा ही निरंतर अद्यतन प्रक्रिया आहे. अशा सुधारणा कोणत्याही निवडणुकांसाठी नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत करता येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
---------------------------------
मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार यादीतील संख्या
तालुका पुरूष स्त्री तृतीयपंथी एकूण
अक्कलकुवा १,४५,९२३ १,३७,३४७ ८ २,८३,२७८
शहादा १,५२,८०१ १,५१,७५४ ४ ३,०४,५५९
नंदुरबार १,५२,१६५ १,४९,६६५ ०० ३,०१,८३०
नवापूर १,३२,३०९ १,३७,८६७ ०२ २,७०,१७८
एकुण ५,८३,१९८ ५,७६,६३३ १४ ११,५९,८४५
----------------------------------
गैरहजर, स्थलांतरीत, मयत, दुबार नोंदणी
विधानसभा मतदार संघ एकूण मतदार डिजीटाझ्ड मयत स्थलांतरीत दुबार गैरहजर इतर एकूण
अक्कलकुवा ३,३२,७८६ २,८३,२७१ १०,७४५ २४,८५३ १०,२५८ ३२,२९३ ४३० ४९,५१५
शहादा ३,५७,०९६ ३,०४,५४९ १४,४८९ २०,८९८ ९,३६८ ७,५५३ २३९ ५२,५४७
नंदुरबार ३,६०,७०१ ३,०१,८३० १६,२४६ २८,०८७ ९,५४१ ४,५२८ ४६९ ५८,८७१
नवापूर २,९७,९९९ २,७०,१७७ ७,७७६ १३,१९३ ३,९२४ २,६६८ २५३ २७,८१४
एकूण १३,४८,५७४ ११,५९,८२७ ४९,२५६ ८७,०३१ ३३,०९१ १७,९७८ १,३९१ १,८८७४७