रोटरी क्लब ऑफ सटाणा

रोटरी क्लब ऑफ सटाणा
Published on
लेखक फोटो रोहित डी. शिंदे -NSK26H28472 फोटो -NSK26H28473 रोटरी क्लब ऑफ सटाणा : सेवेतून समाजपरिवर्तनाची वाटचाल समाजाच्या गरजा ओळखून कोणत्याही अपेक्षेशिवाय मदतीचा हात पुढे करणे, दुःखात सहभागी होणे आणि सकारात्मक बदल घडविणे, हीच रोटरीची खरी ओळख आहे. याच सेवाभावातून रोटरी क्लब ऑफ सटाणा गेली २५ वर्षे समाजाच्या विविध घटकांसाठी सातत्याने कार्यरत आहे. - रोहित डी. शिंदे, सटाणा महाविद्यालयीन जीवनापासून रोटरीच्या कार्याकडे मी जवळून पाहत आलो आहे. गरजू नागरिकांसाठी उभारल्या जाणाऱ्या सुविधा, समाजोपयोगी उपक्रम आणि सेवेतून जपले जाणारे मैत्रीचे नाते यांनी मला कायम प्रेरणा दिली. आज अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना या गौरवशाली परंपरेचा भाग असल्याचा अभिमान असून, ती अधिक सक्षमपणे पुढे नेण्याची जाणीवही आहे. डॉ. प्रकाश जगताप, डॉ. अंजली जगताप, मनोज जाधव, बी.डी. बोरसे,प्रल्हाद तात्या पाटील आणि प्रा.शांताराम गुंजाळ यांसारख्या ज्येष्ठ सदस्यांनी क्लबच्या समाजसेवेची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या दूरदृष्टी, सातत्य आणि निःस्वार्थ सेवाभावामुळे रोटरीचे कार्य शहरापुरते मर्यादित न राहता तळागाळापर्यंत पोहोचले. गेल्या २५ वर्षांत लाभलेल्या २५ अध्यक्षांनीही नवीन कल्पना, प्रकल्प आणि उपक्रम राबवून क्लबची व्याप्ती वाढविली. त्यामुळे रोटरी ३०३० जिल्ह्यात क्लबने सन्मानाची स्वतंत्र ओळख निर्माण केली. हा गौरव प्रत्येक अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य आणि हितचिंतकाच्या सामूहिक योगदानाचा आहे. आरोग्यसेवेत प्रयाग डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना आधार मिळाला आहे. खर्चिक आणि सातत्याने आवश्यक असलेल्या डायलिसिस उपचारामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना या सेवेतून मोठा दिलासा मिळतो. रोटरी आय हॉस्पिटलच्या माध्यमातून ३४ नेत्रतपासणी शिबिरांत हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, गरजू रुग्णांवर अल्पदरात नेत्रशस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत. गरजूंसाठी आर्थो बँकेच्या माध्यमातून हॉस्पिटल बेड, व्हीलचेअर, वॉकर, शवपेटी, कमोड चेअर आणि अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. विविध रक्तदान शिबिरांतून गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देत जीवनदानाचे कार्य केले जाते. दर महिन्याला होणाऱ्या सर्वरोग निदान शिबिरांमधून वेळेवर तपासणी व उपचाराची सुविधा नागरिकांना मिळत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वीरगाव पाडे (ता.बागलाण) वनराई प्रकल्पातून २५,००० वृक्षांची लागवड व संगोपन करण्यात आले. वृक्षलागवडीसोबत संगोपनाला दिलेले महत्त्व ही या उपक्रमाची विशेष जमेची बाजू आहे. युवकांमध्ये नेतृत्व, सामाजिक जाणीव आणि सेवाभाव रुजविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे २ रोटरॅक्ट क्लब आणि माध्यमिक विद्यार्थ्यांचे २२ इंटरॅक्ट क्लब स्थापन करण्यात आले आहेत. महिला आरोग्याच्या क्षेत्रात ९ ते १८ वयोगटातील १,५०० विद्यार्थिनींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी प्रतिबंधक लस मोफत देण्यात आली. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे. ‘सेवेतून मैत्री आणि मैत्रीतून समाजसेवा’ हे आमच्यासाठी केवळ ब्रीदवाक्य नाही, तर रोटरीच्या प्रत्येक सदस्याला प्रेरणा देणारा विचार आहे. गेल्या २५ वर्षांत ज्येष्ठांनी उभा केलेला हा सेवावारसा पुढे नेणे, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि जबाबदारीची बाब आहे. अध्यक्ष म्हणून माझ्या एक वर्षाच्या कार्यकाळात आरोग्य,शिक्षण, पर्यावरण, महिला व बालकल्याण आणि युवक विकास या क्षेत्रांत अधिक गरजूंना थेट लाभ मिळेल, असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर माझा भर राहील. समाजाच्या गरजा समजून घेऊन, सदस्यांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या सहभागातून रोटरीची सेवा अधिक व्यापक करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. २५ वर्षांच्या सेवेतून रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणने विश्वास कमावला आहे; आता त्या विश्वासाला नव्या कामाची आणि नव्या विचारांची जोड देत, ‘सेवा’ हा शब्द केवळ बोलण्यात नव्हे, तर प्रत्येक गरजूच्या आयुष्यात दिसेल, यासाठी काम करणे, हाच माझ्या अध्यक्षपदाच्या वर्षाचा खरा संकल्प आहे. (लेखक रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणचे अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com