पेपरफुटीप्रकरणी गोपाल मराठे यांच्या घराची झाडाझडती

पेपरफुटीप्रकरणी गोपाल मराठे यांच्या घराची झाडाझडती
Published on
NSK26H28508 नंदुरबार : मंगळवारी ऋतुजा पाटील हिला घेऊन जाताना मुंबई पोलिसांचे पथक. ---- पेपरफुटी प्रकरणी ऋतुजा पाटील ताब्यात --- मुंबईच्या पथकाकडून नंदुरबारात गोपाल मराठेच्या घराची झाडाझडती सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षकपदाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी (ता. १) पुन्हा नंदुरबारात दाखल झाले होते. पथकाने अटकेत असलेला ‘एमपीएससी’चा सहायक कक्ष अधिकारी गोपाल मराठे याच्या घराची झडती घेतली व या प्रकरणातील संशयित ऋतुजा पाटील हिला तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील संशयितांची संख्या पाचवर पोहोचली आहे. औषध निरीक्षकपदाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणात ‘नंदुरबार कनेक्शन’ उजेडात आले. या प्रकरणी आतापर्यंत कौटिल्य अकादमीचा संचालक प्रवीण पाटील, परिवर्धा शाळेचा मुख्याध्यापक अमृत पाटील, परीक्षार्थी गौरव पाटील यांना अटक झाली असून, तिघांची मुंबई पोलिसांच्या पथकामार्फत चौकशी सुरू आहे. ‘एमपीएससी’च्या काही अधिकाऱ्यांनाही अटक झाली. यात कक्ष अधिकारी गोपाल मराठे हा दहिंदुले (ता. नंदुरबार) येथील रहिवासी आहे. मराठे कौटिल्य अकादमीचा माजी विद्यार्थी असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी मुंबई गुन्हे शाखेचे पथक मराठे याच्यासह नंदुरबारात दाखल झाले. सुरुवातीला पथकाने नंदुरबार शहर पोलिसांना तपासाबाबत माहिती दिली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने मराठे याच्या घराची झडती घेतली, तसेच त्याच्या मालमत्तेचीही माहिती घेतली जात आहे. पेपरफुटी प्रकरणात काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याचा तपास पोलिस करीत आहेत. ऋतुजा पाटीलला पथकाने ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वात पाच अधिकाऱ्यांचे पथक मुंबईहून नंदुरबारात आले होते. पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. यात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. ऋतुजा पाटीलला घेऊन पथक मुंबईला रवाना ऋतुजा पाटीलला ताब्यात घेतल्यावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पथक ऋतुजाला बरोबर घेऊन मुंबईकडे रवाना झाले. ऋतुजा आणि गौरव यांच्यात पेपरफुटी प्रकरणी संभाषण झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाच्या तपासकामी मुंबईचे पथक वारंवार नंदुरबारात येत असल्याने या प्रकरणात नंदुरबारची अधिक चर्चा होत आहे. पेपरफुटीचे धागेदोरे मुंबई पोलिस शोधत असून, सहभागी असलेल्या संबंधितांचा कसून शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com