अत्यावश्यक कामांना आयुक्तांकडून मंजुरीला सुरुवात

अत्यावश्यक कामांना आयुक्तांकडून मंजुरीला सुरुवात
Published on
टुडे पान चार मेन फिचर (महापालिका इमारत व एआय चित्र वापरावे) ---------- अखेर अत्यावश्‍यक कामांच्या मंजुरी प्रक्रियेला गती आयुक्तांकडून प्रस्तावांची छाननी; रस्ते दुरुस्तीनंतर आता होणार मूलभूत सुविधांची कामे सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : शहरातील १९ प्रभागांमध्ये नगरसेवकांनी सादर केलेल्या विविध विकासकामांच्या प्रस्तावांपैकी अत्यावश्यक कामांना मंजुरी देण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजा, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांशी संबंधित कामांना प्राधान्य देत प्रस्तावांची छाननी केली जात आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या विकासकामांना आता गती मिळण्याची शक्यता आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते, गटारी, पथदीप तसेच इतर मूलभूत सुविधांसंदर्भात नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव सादर केले आहेत. महापौर दीपमाला काळे यांच्याकडे सुमारे ३०० ते ३५० कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव सादर झाले आहेत. सर्व प्रभागांना समान निधी देण्याच्या धोरणानुसार प्रत्येक प्रभागासाठी ५४ लाख रुपयांचा निधी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. खड्डे दुरुस्तीचे काम सुरू मात्र, एकाचवेळी सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्याऐवजी नागरिकांच्या दृष्टीने कोणती कामे तातडीची आहेत, यानुसार प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येत आहे. पावसाळ्यात शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रस्ते दुरुस्तीला प्रशासनाने प्रथम प्राधान्य दिले. खड्डे बुजविण्यासाठी १ कोटी ९० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली असून, प्रत्येक प्रभागासाठी १० लाख रुपयांच्या निधीतून खड्डे बुजविण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे सध्या सुरू आहेत. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य आयुक्त आदित्य जीवने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नागरिकांच्या दृष्टीने अत्यावश्यक आणि अतिमहत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन मंजुरी देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने अन्य प्रस्तावांवरही निर्णय घेतला जाणार आहे. चौकट कामे मंजुरीसाठी नगरसेवकांची धडपड दरम्यान, रस्ते दुरुस्तीबरोबरच इतर अत्यावश्यक विकासकामांनाही मंजुरी मिळावी, यासाठी नगरसेवकांकडून आयुक्त आदित्य जीवने यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केले जात आहे. त्यानुसार प्रस्तावांची प्राथमिकता ठरवून मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभागनिहाय विकासकामांच्या प्रस्तावांची संख्या मोठी असल्याने कोणत्या कामांना प्रथम मंजुरी मिळते, याकडे आता नगरसेवकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com