विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मिळाली हॅकेथॉनमधून दिशा

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मिळाली हॅकेथॉनमधून दिशा
Published on
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मिळाली हॅकेथॉनमधून दिशा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि केबीसीएनएमयू सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस (केसिआयआयएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२६’अंतर्गत विद्यापीठात इंटरनल हॅकेथॉन नुकतेच झाले. हॅकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध संघांनी ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’साठी निवडलेल्या समस्यांवर आधारित नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले. सहभागी संघांनी प्रकल्पाची संकल्पना, समस्येची व्याप्ती, प्रस्तावित उपाययोजना, तांत्रिक अंमलबजावणी, व्यवहार्यता व संभाव्य सामाजिक परिणामाबाबत परीक्षकांसमोर मांडणी केली. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे मूल्यमापन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास गजरे, केसीआयआयएलचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, जैवशास्त्र प्रशाळेचे सहयोगी प्रा. डॉ. नवीन दंडी, एसएसबीटी महाविद्यालयाचे प्रा. तेजस भैसे व केसीआयआयएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंडारे यांनी केले. यावेळी जैवशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. भूषण चौधरी, प्रा. डॉ. अरुण इंगळे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत आपल्या कल्पना व तंत्रज्ञानाधारित उपाय प्रभावीपणे मांडले. संघभावना, सर्जनशीलता, चिकित्सक विचार, समस्या निराकरण व सादरीकरण कौशल्यांना या उपक्रमातून चालना मिळाली. राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य दिशा देण्याच्यादृष्टीने हा इंटरनल हॅकेथॉन महत्त्वपूर्ण ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com