विकसित भारतासाठी नशामुक्त युवा सांस्कृतिक स्पर्धा

विकसित भारतासाठी नशामुक्त युवा सांस्कृतिक स्पर्धा
Published on
शहर टुडे पान दोनसाठी ----------------- NSK26H28645 जळगाव : मूळजी जेठा महाविद्यालयात आयोजित नशामुक्त युवा सांस्कृतिक स्पर्धेत उपस्थित युवकांना नशामुक्तीची शपथ देताना कमलेश सोनवणे. समवेत मान्यवर. --------------- मूळजी जेठा महाविद्यालयात नशामुक्त सांस्कृतिक स्पर्धा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.३ : विकसित राष्ट्राच्या निर्मितीसाठी युवकांनी व्यसनमुक्त राहून समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचविणे आवश्यक आहे. या उद्देशाने केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ मंचातर्फे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व कान्ह ललित केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मूळजी जेठा महाविद्यालयात जिल्हास्तरीय ‘नशामुक्त युवा’ सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच झाल्या. या स्पर्धेत नृत्य, संगीत, पथनाट्य यांसह विविध आठ प्रकारच्या सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन नारखेडे, विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रवीण महाले, जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे, संस्थेचे सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर, शाहीर विनोद ढगे, एनएसएस समन्वयक डॉ. अखिलेश शर्मा, कमलेश सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कमलेश सोनवणे म्हणाले की, जिल्ह्यातून मादक पदार्थांच्या वापराचा समूळ नाश करण्याचा विडा आपण सर्वांनी उचलला पाहिजे. त्यांनी उपस्थित युवकांना नशामुक्तीची शपथ दिली. स्पर्धेसाठी ‘माय भारत’ स्वयंसेवक व महाविद्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com