(जाहिरात विभागाशी संबंधित, बातमी आवश्यक)
---
लोगो : मार्केट अपडेट्स
NSK26H28666
जळगाव : रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स शोरुममध्ये साकारलेल्या ‘द फस्ट लूक’ दागिन्यांच्या प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय.
------
‘द फर्स्ट लूक’ साकारले आता
रतनलाल सी. बाफना शोरूममध्ये
उपशीर्षक
७ सप्टेंबरपर्यंत प्रदर्शनाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘द फर्स्ट लूक - सीझन २’ या विशेष दागिने प्रदर्शनाला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्या पार्श्र्वभूमीवर आता रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने ‘द फर्स्ट लूक - सीझन २’ पुन्हा एकदा आपल्या शोरूममध्ये साकारले आहे.
१ ते ७ सप्टेंबरदरम्यान नयनतारा-२, भवानी पेठ, जळगाव येथे सकाळी ९.३० ते रात्री ९ या वेळेत हे विशेष प्रदर्शन ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहे.
केवळ तीन दिवसांच्या या प्रदर्शनात मोठ्या संख्येने ग्राहकांनी उपस्थिती लावत विविध प्रांतांतील दागिन्यांच्या कलाकुसरीचा आणि वैविध्यपूर्ण संग्रहाचा अनुभव घेतला. कोलकाता, जयपूर, अमृतसर, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, गुजरात, मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांच्या शैलींचा वैविध्यपूर्ण संग्रह या प्रदर्शनात पाहायला मिळतो. यासोबतच डायमंड, ब्रायडल, सिल्व्हर, लाइटवेट, अँटिक आणि डिझायनर ज्वेलरीचे विविध पर्यायही ग्राहकांसाठी आकर्षण ठरत आहेत. प्रदर्शनात दागिन्यांच्या निर्मितीपासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंतच्या प्रक्रियेत शुद्धता, पारदर्शकता आणि विश्वास यांना दिले जाणारे महत्त्व ग्राहकांना समजावून सांगण्यात येत आहे.