हवेत गोळीबार करणाऱ्या
सरपंचाला न्यायलयीन कोठडी
सकाळ वृत्तसेवा
दहिगाव (ता. यावल), ता. ४ : कोळन्हावी (ता. यावल) येथील सरपंचाने डांभुर्णीतील चौकात गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी (ता. ३१) त्यांची कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यांची रवानगी भुसावळ कारागृहात झाली आहे.
कोळन्हावीचे सरपंच विकास ऊर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७) यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये देशी दारू विक्री केली जात असल्याचा व्हीडीओ काढल्याच्या रागातून २७ ऑगस्टला रात्री डांभुर्णी (ता. यावल) येथील चौकात गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला व दहशत निर्माण केली होती. त्यांना अटक केली होती. याबाबत हवालदार हितेश बागूल यांच्या फिर्यादीवरून विकास ऊर्फ गोटू सोळुंके व रोशन भिमराव सपकाळे (रा. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सोळुंके तीन दिवस पोलिस कोठडीत होते. त्यांची काेठडी संपल्यावर सोमवारी त्यांना यावल न्यायालयात हजर केले असता, त्याला प्रथमवर्ग न्यायधीश आर. एस. जगताप यांनी १४ दिवसांची न्यायलयील कोठडी सुनावली. त्यांची रवानगी भुसावळ उपजिल्हा कारागृहात झाली आहे.