अपघातात पती-पत्नी ठार

अपघातात पती-पत्नी ठार
Published on
पान एक ---------------- 28895, 28896 कावठे : अपघातग्रस्त नेरकर दांपत्याची दुचाकी. दुसऱ्या छायाचित्रात अपघातात मृत राजेंद्र नेरकर व रेखा नेरकर. -- कावठेजवळ अपघातात पती-पत्नी जागीच ठार -- आयशर-स्कूटीचा भीषण अपघात ; परतीच्या प्रवासात काळाचा घाला -- सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. ५ : साक्री शहराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कावठे (ता. साक्री) गावालगत असलेल्या हॉटेल ताजजवळ शनिवारी (ता. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला. राजेंद्र महारू नेरकर (वय ६६) आणि रेखा राजेंद्र नेरकर (वय ५९, दोघे रा. वसमार, ह.मु. म्हसदी) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. नेरकर दाम्पत्य दहिवेलकडून साक्रीकडे दुचाकीवरून (जीजे १६ एएम ४८६६) येत असताना समोरून येणाऱ्या आयशर ट्रकसोबत (जीजे १३ एएक्स ७४८४) त्यांची धडक झाली. अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना १०८ रुग्णवाहिका आणि खासगी रुग्णवाहिकेच्या मदतीने साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉ. मुकेश मोरे यांनी दोघांना मृत घोषित केले. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून आयशर ट्रकचे पुढील दोन्ही चाक फुटल्याने दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून पुढील मोठा अनर्थ टळला. - अखेरचा ठरला तो संवाद नातेवाईकांच्या भेटीनिमित्त गेलेले दोन्ही भाऊ व भाऊजाई गावावरून परतत असताना, आम्हास साक्री शहरात काम असल्याने शहरातून काम आटोपून म्हसदीकडे येतो, तुम्ही सरळ शहराबाहेरून जाणाऱ्या मार्गाने पुढे निघा, असे मृत नेरकर सोबत असलेल्यास म्हणाले. मात्र हाच संवाद त्यांचा अखेरचा ठरला आणि काही क्षणातच काळाने नेरकर दाम्पत्याला हिरावून नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com