२९२६६
नाशिख : सावाना बालभवन सानेगुरूजी कथामाला आयोजित गणपती मूर्ती कार्यशाळेत मूर्ती घडवितांना विद्यार्थी
सावाना गणेशमूर्ती कार्यशाळा,
स्पर्धेत निरव, रूद्र प्रथम
नाशिक, ता. १० : सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन सानेगुरुजी कथामालेतर्फे गणपती बनविणे कार्यशाळा व स्पर्धा घेण्यात आली. शहरातील विविध शाळेतील ९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्पर्धेत आहाना बेळे, निरव आबड, रूद्र जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळविला. गंगापूर रोड येथील सावानाच्या गो. ह. देशपांडे उद्यान वाचनालयात (ता.६) कार्यशाळा व स्पर्धा दोन गटात पार पडली. परीक्षक म्हणून रुपाली रोटवदकर, मनीष जोगळेकर यांनी काम पाहिले तर, विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे प्रशिक्षण किरण चौरे यांनी दिले. यावेळी वाचनालयाचे प्रमुख सचिव गिरीश नातू, जयेश बर्वे, देवदत्त जोशी, प्रेरणा बेळे, सुनेत्रा मांडवगणे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश गायधनी यांनी सूत्रसंचालन केले.
--------
स्पर्धेचा निकाल असा
पहिली ते दुसरी : आहाना बेळे, सिया शेवाळे, गिरिजा मांडवगणे. उत्तेजनार्थ : लावीस जाधव
तिसरी ते पाचवी : निरव आबड, ओमराज प्रजापती, गौतमी नवले. उत्तेजनार्थ : निशांत साळवे अन्विका आरंभी, स्वरा अलई, सार्थक इंगळे.
सहावी ते आठवी : रूद्र जाधव, राशी किंगे, गिरवाण शेटे. उत्तेजनार्थ : कौस्तुभ काळे, सान्वी शेरकर, सार्थक चव्हाण, विनित विसपुते, नाविन्या म्हस्के.