NSK26H29367
जळगाव : स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेबाहेर शुक्रवारी निदर्शने करताना बँक कर्मचारी.
---
बँक कर्मचाऱ्यांचा संप; ८०० कोटींचे व्यवहार ठप्प
(उपशीर्षक)
पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी; सलग चार दिवस बँका बंद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ ः राष्ट्रीयकृत बँकांचाही पाच दिवसांचा आठवडा तत्काळ लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. ११) युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सतर्फे देशव्यापी संप पुकारला आहे. संपात जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांमधील १२०० हून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले होते. यामुळे साधारण ८०० कोटी रूपयांचे व्यवहार ठप्प झाले. संपामुळे बँकांमध्ये आलेल्या नागरिकांना परत जावे लागले.
दरम्यान, संपामुळे बँका पुढील चार दिवस बंद राहणार आहेत. संपामुळे शुक्रवारी व्यवहार बंद होते. दुसरा शनिवारी (ता. १२), नंतर रविवारी (ता. १३) व सोमवारी (ता.१४) गणेश चतुर्थीनिमित्त सुटी आहे. यामुळे बँकांमधील व्यवहार चार दिवस बंद राहणार असल्याने ग्राहकांची गैरसोय होणार आहे.
सर्व कर्मचाऱ्यांनी स्टेट बँकच्या मुख्य शाखेसमोर निदर्शने केली. स्टेट बँकेचे प्रसाद पाटील, मिलिंद पाटील, धिरज भगत, पंजाब नॅशनल बँकेचे धिरज वर्मा, श्याम चौधरी, बँक ऑफ इंडियाचे किशोर वर्मा, सेंट्रल बँकेचे भरत जाधव, बँक ऑफ महाराष्ट्रचे मोहन खेनवलकर, बँक ऑफ बडोद्याचे नीलेश शिपालकर यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाली होते.
बँकिंग सेवांवर होणारा परिणाम
संपात सहभागी होणाऱ्या शाखा व कार्यालयांमध्ये नियमित बँकिंग कामकाजावर परिणाम होऊ शकतो. रोकड जमा करणे व काढणे, क्लिअरिंगशी संबंधित काम, सेफ डिपॉझिट/ लॉकर सेवा आणि इतर शाखास्तरीय व्यवहारांमध्ये अडथळा येऊ शकतो. डिजिटल व इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवा तांत्रिक व कार्यान्वयनाच्या उपलब्धतेनुसार सुरू राहू शकतात. डिजिटल व इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवामुळे आता बँकिंग व्यवहार पूर्णपणे बंद राहत नाही. त्यामुळे पाचदिवसीय आठवडा करण्यास काहीही हरकत नसल्याचे नमूद केले आहे.
इन्फो
तीन दिवसांचा संप
संपानंतरही मागण्या वेळेत मान्य न झाल्यास येत्या २८ ते ३० सप्टेंबर, असे तीन दिवस बँक युनियन आणि बँक कर्मचारी संपावर राहतील, असा इशारा युनायटेड फॉर्म ऑफ बँक युनियनने दिला आहे.