ॲंकर
समर्पक छायाचित्र वापरता येईल.
––––
सोशल मीडियावर ‘१९८०’चा वाढता ट्रेंड
(उपशीर्षक)
जुन्या काळातील लूक साकारण्याची सर्वांनाच क्रेझ; रेट्रो फोटोची धूम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : सोशल मीडियावर सध्या १९८० च्या दशकातील लूकमध्ये स्वतःचे फोटो तयार करण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. आधुनिक कपडे आणि स्टाईलऐवजी जुन्या काळातील पोशाख, हेअरस्टाइल, फोटोचा रंग, पार्श्वभूमी आणि त्याकाळातील वातावरण दाखविणारे फोटो एआयच्या मदतीने तयार करून ते सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. त्यामुळे तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण या ‘रेट्रो लूक’च्या ट्रेंडमध्ये गुंतल्याचे दिसत आहे.
सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या साईटवर अधूनमधून नवनवीन ट्रेंड येत असल्याचे पहावयास मिळते. या ट्रेंडमध्ये प्रामुख्याने तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात बिझी होत असते. काही पोस्ट किंवा ट्रेंड असा असतो, ज्यात तरूणाईपासून तर अगदी सोशल मिडीयाचा वापर करणार्या प्रत्येकाला मोह आवरला जात नाही. असा नवा ट्रेंड सध्या सोशल मिडीयावर सध्या जोरदार सुरू आहे. तो म्हणजे १९८०चा लुक. एआयच्या मदतीने आपल्या फोटो बदल करणारा हा ट्रेंड जोरदार व्हायरल झाला आहे.
जुना लूक, नवा अंदाज
मोबाईलमधील एआय टूल किंवा फोटो एडिटिंग ॲपच्या माध्यमातून सध्याचा फोटो अपलोड करून त्याला १९८०च्या दशकातील रूप देता येते. आताचा लेटेस्ट फोटो अपलोड करून त्याला जुन्या काळातील कपडे, मिशी-हेअरस्टाइल, सायकल, रेडिओ, जुन्या घरांची किंवा रस्त्यांची पार्श्वभूमी अशा विविध कल्पनांमधून फोटो तयार केले जात आहेत. या ट्रेंडमध्ये स्वतःचे फोटोच नव्हे, तर आई-वडील, आजी-आजोबा यांच्या जुन्या काळातील छायाचित्रांना नव्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत तयार केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.
चौकट
काळजी महत्ताची
साधा सेल्फी किंवा जुना फोटो एआय टूलवर अपलोड करून त्याला १९८० च्या दशकातील फोटो तयार करून देत आहे. परंतु, याद्वारे गैरवापर करणे नाकारता येत नाही. यामुळे लहान मुलांचे किंवा स्वतःचे फोटो एआय टूलवर अपलोड करताना काळजी घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक सोशल मीडिया खात्यांवर उपलब्ध असलेल्या छायाचित्रांचा चुकीच्या एआय साधनांद्वारे गैरवापर होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.