​निमाणीतून सुटणार्या बसेस मेळा, ठक्कर बसस्थानकातून सुटतील

​निमाणीतून सुटणार्या बसेस मेळा, ठक्कर बसस्थानकातून सुटतील
Published on
​निमाणीतून सुटणाऱ्या बस मेळा, ठक्कर बसस्थानकातून सुटणार बसस्थानकाचे काँक्रीटीकरण : १४ पासून मार्गांत बदल; अधिसूचना लागू सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : निमाणी बसस्थानकात काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात येत असल्यामुळे तसेच द्वारका भुयारी मार्ग व उड्डाणपुलाखालील वाहतूक सुरळीत झाल्याने, शहरातील एसटी बस फेऱ्यांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. १४ ते २१ सप्टेंबरदरम्यान, प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीचे हे नवीन मार्ग लागू राहतील, अशी अधिसूचना शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी जारी केली आहे. -- बसस्थानक व तेथून सुटणाऱ्या बस निमाणी बसस्थानक : येवला, लासलगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, जिंतूर, बुलढाणा, लोणार आणि पुढे जाणाऱ्या सर्व फेऱ्या. मेळा बसस्थानक : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे (शिवाजीनगर), मालेगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जळगाव, चोपडा, धुळे, शिरपूर, शहादा, सुरत, वापी व इंदूर मार्गावरील सर्व फेऱ्या. नवीन सीबीएस (ठक्कर) बसस्थानक : त्र्यंबकेश्वर, सिन्नर, इगतपुरी ग्रामीण फेऱ्या; पालघर विभाग; तसेच नंदुरबार, साक्री, सटाणा, वलसाड, कळवण, पेठ, सप्तशृंगीगड, सुरगाणा मार्गावरील ग्रामीण वाहतूक. महामार्ग बसस्थानक (मुंबई नाका) : शिर्डी, अहिल्यानगर, कसारा व मुंबई मार्गावरील सर्व बस. -- असा आहे सुधारित मार्ग : ​- मेळा स्थानक : धुळे व जळगावकडे जाणाऱ्या बस जाताना : मेळा बसस्थानक- जुनी जिल्हा परिषद- खडकाळी सिग्नल- सारडा सर्कल- मदिना चौक- मुंबई नाका उड्डाणपुलाखालून- वडाळा नाका- द्वारका- संतोष टी पॉइंट- स्वामिनारायण चौक- अमृतधाम- बळीमंदिर चौक- आडगाव मार्गे पुढे धुळे/जळगाव. येताना : आडगाव - जत्रा हॉटेल - अमृतधाम- द्वारका- मुंबई नाका- सारडा सर्कल- जुनी जि.प. मार्गे मेळा बसस्थानक. ​- मेळा स्थानक : पुणे (शिवाजीनगर) मार्ग मेळा स्थानक- गडकरी सिग्नल- मुंबई नाका- इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक- साईनाथ सिग्नल- रविशंकर मार्ग- उपनगर- बिटको सिग्नल- सिन्नर फाटा मार्गे पुढे. - नवीन सीबीएस (ठक्कर) बसस्थानक : पेठ, कळवण व सप्तशृंगगड मार्ग नवीन सीबीएस (ठक्कर)- जुनी जि.प. - सारडा सर्कल- मुंबई नाका- द्वारका- संतोष टी पॉइंट- निमाणी बसस्थानक- दिंडोरी नाका मार्गे पुढे. -महामार्ग बसस्थानक : मुंबई व शिर्डी/अहिल्यानगर मार्ग ​शिर्डी/अहिल्यानगर : महामार्ग बसस्थानक- मुंबई नाका- उपनगर- बिटको सिग्नल- सिन्नर फाटा मार्गे. ​मुंबई/कसारा : महामार्ग स्थानक- मुंबई नाका- लेखानगर- पाथर्डी फाटा- गरवारे पॉइंट मार्गे कसारा/मुंबईकडे. --- कोट फोटो : H29419 प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि एसटी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी हे तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसचालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. - चंद्रकांत गवळी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com