फोटो : H29554
नाशिक : गोवंश कत्तलीप्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित. समवेत शहर गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक.
गोमांस विक्री प्रकरणी पाच जणांना अटक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : भद्रकालीतील दख्खनीपुरा परिसरातील एका गाळ्यात बेकायदेशीरपणे गोवंशांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या टोळीचा शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोन व अंबड गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या संयुक्त कारवाईत पाच संशयितांना अटक केली असून १९० किलो गोमांस, कत्तलीचे साहित्य, मोबाईल आणि रोख रक्कम असा २ लाख ५ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना, सहायक उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर यांना दख्खनीपुरा येथील गाळ्यात गोवंशांची कत्तल करून दुसऱ्या दुकानातून गोमांसाची विक्री सुरू असल्याची खबर मिळाली. त्यानुसार प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत रेहान फारुक कुरेशी (३१), वसीम फारुक कुरेशी (३८, दोघे रा. कोकणीपुरा, भद्रकाली), मजीद खैराती कुरेशी (५६, रा. गंजमाळ), ईसाक अजीज कुरेशी (५६) आणि जहीर ईसाक कुरेशी (वय २८, दोघे रा. मिरादातीर, जुने नाशिक) या पाच जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रदीप नन्नावरे, महेश खांडबहाले, तेजस मते, अंबड गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, योगेश चव्हाण, महेंद्र दोंदे, संजय बेनके यांच्या पथकाने केली. दरम्यान, संशयितांकडे चौकशी केली असता, त्यांनी संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथील कासीम कुरेशी याच्याकडून कत्तलीसाठी गोवंश आणल्याचे कबूल केले.