टुडे चार ॲंकर
NSK26H29761
जळगाव : ‘लडाख मॅरेथॉन’चे २१ किलोमीटर अंतर २ तास १७ मिनिटांत पार केल्यानंतर पदकासह समर्थ खटोड.
-----
जळगावच्या तरुणाने पार केली आव्हानात्मक ‘लडाख मॅरेथॉन’
उपशीर्षक
समर्थ खटोडचे स्पर्धेत यश; २१ किमी अंतर २ तास १७ मिनिटांत पार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : इतर कोणत्याही स्पर्धेपेक्षा कठीण मानली जाणारी डोंगर- दऱ्यांमधील अत्यंत आव्हानात्मक
''लडाख मॅरेथॉन'' सर करून येथील तरुणाने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. समर्थ खटोडने २१ किलोमीटरचे अंतर अवघ्या २ तास १७ मिनिटांत पार करत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
समुद्रसपाटीपासून तब्बल १२ हजार ५०० फूट उंचीवर वसलेल्या लडाखच्या खडतर डोंगराळ प्रदेशात दरवर्षी ही मॅरेथॉन आयोजित केली जाते. हवेतील ऑक्सिजनचे कमी प्रमाण, हाडे गोठवणारी बोचरी थंडी आणि चेहऱ्यावर टोचणारे तीव्र ऊन अशा प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीचा सामना करत समर्थने ही स्पर्धा पूर्ण केली.
शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक कणखरतेची खरी परीक्षा पाहणाऱ्या या स्पर्धेत समर्थने दाखवलेले हे सातत्य आणि दमदार प्रदर्शन कौतुकास्पद ठरले आहे.
------
प्रतिकूल हवामान
इतर कोणत्याही स्वरुपाच्या मॅरेथॉनपेक्षा ही स्पर्धा अत्यंत कठीण व आव्हानात्मक असते. रात्रीचे तापमान २ ते ३ अंश, दिवसाचे १८ अंशांपर्यंत असते. समुद्रसपाटीपासून १२ हजार फूट उंचावरील हा प्रदेश. स्पर्धेचे क्षेत्र डोंगर-दऱ्यांचे असल्याने चढ उतार खूप असतात. उचावरील प्रदेशामुळे प्राणवायुचे प्रमाण अन्य क्षेत्रांपेक्षा ४० टक्क्यांहूनही कमी. त्यामुळे श्वास घ्यायला प्रचंड त्रास होता. अशा स्थितीत धावायचे असते.
-----
कोट
या स्पर्धेत उतरून ती यशस्वी करायची हे वर्षभरापासून ठरवले होते. वर्षभरापासून स्पर्धेची तयारी सुरू केली. मे महिन्यात नोंदणी केली. अशाप्रकारच्या स्पर्धेसाठी हातापायांचे स्नायू मजबूत असावे लागतात. त्यासाठी नियमित व्यायामावर भर दिला. जळगाव रनर्स ग्रुपचे गुरुप्रसाद तोतला, किरण बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे स्पर्धा पार करु शकलो.
- समर्थ खटोड