एन्कर
फोटो : H29799
लाडक्या गौराईंचे आज आगमन
उत्साहाचे वातावरण; साहित्य खरेदीसाठी लगबग
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६: गणेशोत्सवानंतर लगेचच वेध लागतात ते लाडक्या गौराईंचे. गुरुवारी (ता. १७) सोनपावलांनी गौराईंचे आगमन होणार असल्याने घराघरात आनंदाचे वातावरण आहे. बुधवारी सकाळपासून बाजारपेठांमध्ये महिलांची गौराईंचे साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू असल्याचे बघायला मिळाले. ज्येष्ठा गौरीचे व्रत नक्षत्र प्रधान व्रत असल्याने अनुराधा नक्षत्रावर गौरीची स्थापना करावी. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे पूजन करून व मूळ नक्षत्रावर उत्थापन करावे असे व्रताच्या विधानामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे अनुराधा नक्षत्र असेल त्याच वेळेला जेष्ठा गौरीची स्थापना करावी असे धर्म शास्त्राच्या अभ्यासकांनी सूचित केले आहे.
अशी करावी गौराईंची पूजा
ज्येष्ठागौरी आवाहन : १७ सप्टेंबर अनुराधा नक्षत्र सायंकाळी ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंत आहे. त्यामुळे सूर्योदयापासून संध्याकाळी ७ वाजून ५४ पर्यंत गौराईंची स्थापना करावी. ज्येष्ठा गौरी पूजन नैवेद्य आरती जेष्ठा नक्षत्रावर सांगण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. १८) सकाळपासून रात्री १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत पर्यंत पूजन करावे. ज्येष्ठा गौरी उत्थापन मूळ नक्षत्रावर करावे लागते. त्यामुळे (ता. १९) शनिवारी सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत गौरी उत्थापन करून घ्यावे. सकाळी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून मुखवटे हलवून ठेवावेत व नंतर सोयीनुसार इतर कार्य करावे.
-- कोट
पूजेच्या वेळी देवीला अर्पण केलेला सोळा गाठींचा दोरक घरातील स्त्रियांनी उत्थापन झाल्यावर गळ्यात धारण करावा. तो अश्विन शु अष्टमीपर्यंत गळ्यात ठेवावा ते महालक्ष्मीचे प्रतीक असते.
डॉ. नरेंद्र धारणे, ज्योतिष- धर्मशास्त्रतज्ज्ञ
-----------