धुळे ः टुडे १ साठी, मेन............टॉपला
---
सिंगल कॉलम लोगो छायाचित्र ः 29982
---
पाच कोटींतून होणार सहा कामे!
मनपा स्थायीची मंजुरी; फुले, नारळाच्या कचऱ्यापासून उपयुक्त उत्पादने
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ ः मूलभूत सोयी-सुविधांचा विकास योजनेंतर्गत महापालिकेच्या स्थायी समिती सभेने सुमारे पाच कोटी रुपये खर्चाच्या कामांची निविदा मंजूर केली. यात सहा कामांचा समावेश आहे. तसेच फुले व नारळाच्या कचऱ्यातून उपयुक्त उत्पादने तयार करण्याचा महिला बचत गटाचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा शुक्रवारी (ता. १८) सकाळी साडेअकराला महापालिकेत झाली. सभापती लताबाई पोतदार, उपायुक्त हेमंत निकम, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. मूलभूत सोयी-सुविधांचा विकास योजनेंतर्गत सहा कामांसाठी प्राप्त निविदा दर मंजुरीचा विषय समितीपुढे होता. तो मंजूर करण्यात आला. या सहा कामांमध्ये सभागृह, रस्ते, गटार तसेच अभ्यासिकेत फर्निचर व्यवस्थेच्या कामांचा समावेश आहे. यासाठी एकूण चार कोटी ९९ लाख ९३ हजार ६११ रुपये खर्चाला आर्थिक व प्रशासकीय मान्यता होती. निविदा प्रक्रियेअंती हिंद कन्स्ट्रक्शनची (धुळे) सर्वांत कमी अंदाजपत्रकीय दराची निविदा होती. ती मंजूर करण्यात आली.
कामांसाठी मुदतवाढ
सावता माळी मार्केट विकसित करण्याच्या कामासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देणे, सिद्धेश्वर गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर ते मोठा पूल आणि झाशी राणी पुतळा ते अग्रवाल भवनपर्यंत रस्त्याचे हॉट टॉपिंग कामासह ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच स्वच्छ सर्वेक्षण-२०२५, माझी वसुंधरा अभियान-६.०, तसेच घनकचरा नियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियुक्त तांत्रिक सल्लागार अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेला एक वर्ष मुदतवाढ देण्यास स्थायीने मंजुरी दिली. या संस्थेला दरमहा दोन लाख २५ हजार रुपये मनपाकडून अदा होतील. महापालिकेच्या विविध विभागांसाठी स्टेशनरी खरेदीचा विषयही मंजूर करण्यात आला.
---
१४-१
चौकट
रमाई बचत गटाला मंजुरी
माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील फुले व नारळाचा कचरा शाश्वत पद्धतीने व्यवस्थापित करून त्यापासून उपयुक्त उत्पादने तयार करण्यासाठी महिला बचत गटांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यात रमाई महिला बचत गटाचा प्रस्ताव प्राप्त झाला. या गटाला महापालिकेकडून संकलित होणारा फुले व नारळाचा कचरा उपयुक्त उत्पादने तयार करण्यासाठी देण्यास मंजुरी देण्यात आली.