तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढला

तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढला
Published on
फोटो : H30082 डीजीपीनगर : अशोका मेडिकव्हरमध्ये हृदय दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमास उपस्थित उत्तर महाराष्ट्रातील सर्वसमावेशक कार्डियाक टीम. अशोका मेडिकव्हरमध्ये हृदय दिनानिमित्त कार्यक्रम डीजीपीनगर, ता. २० : बदलती जीवनशैली, ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढत आहे. त्यामुळे लक्षणे दिसण्याची वाट न पाहता नियमित तपासणी करून जोखीम घटकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी व कार्डियाक सर्जरी विभागातर्फे जनजागृती कार्यक्रम झाला. इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुधीर शेतकर, डॉ. सीमा नक्साने, डॉ. निर्मल कोलते, डॉ. कांचन भांबारे, डॉ. महेश शिवाजी आहिरे, क्लिनिकल कार्डिओलॉजिस्ट डॉ. हेमंतराज आहिरे, कार्डियाक सर्जन डॉ. प्रणव माळी, डॉ. अझर सय्यद आणि इमर्जन्सी फिजिशियन डॉ. अखिलेश सोमाणी उपस्थित होते. हृदयविकाराच्या आपत्कालीन स्थितीत ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे निर्णायक ठरते. विविध विभागांतील समन्वयामुळे गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होते, असे डॉक्टरांनी सांगितले. ह्रदय दिनानिमित्त एक हजार रुपयांत ‘एसेंशियल हार्ट चेक-अप पॅकेज’ उपलब्ध करण्यात आले आहे. यात ईसीजी, टू-डी इको, टीएमटी, लिपिड प्रोफाइल, क्रिएटिनिन आणि कार्डिओलॉजी कन्सल्टेशनचा समावेश आहे. ३० सप्टेंबरपर्यंत रक्तदाब, रक्तातील साखर व ईसीजी तपासणी मोफत करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे सेंटर हेड अनुप त्रिपाठी यांनी आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com